शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहा मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

By admin | Updated: April 11, 2017 02:01 IST

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सुमारे ९० किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास करणार

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सुमारे ९० किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास करणार असल्याने नागरिकांना उच्च प्रतिचे आणि वेगवान रस्ते मिळणार आहेत. त्यामुळे पैशासह वेळेच्या बचतीबरोबरच वाहतूक आणि पर्यटन उद्योगाला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. महामार्गाच्या विकासाबरोबरच रस्त्यालगतच्या जमिनींचाही भाव चांगलाच वधारणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेटच्या व्यवसायाला नवी झळाळी मिळणार आहे.अलिबाग-वडखळ २२ किलोमीटर, अलिबाग-रेवस २० किलोमीटर, अलिबाग-बाह्यवळण सुमारे दीड किलोमीटर, सारळ- शिरोली- सहा किलोमीटर, मुरुड- आगारदांडा १० किलोमीटर आणि सारळ- मुरुड ३० असे एकूण तब्बल ९० किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत जाणार आहेत. त्यापैकी अलिबाग-वडखळ रस्ता मार्च २०१६ मध्येच राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. २०१५ साली या रस्त्याची मागणी राष्ट्रीय महामार्गाने केली होती. २०१६ मध्ये उर्वरित रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याबाबत अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविले होते. ते रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याला मंजुरी मिळाली आहे.वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण याचा विचार करता या मार्गावर वाहतुकीची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जातो. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असल्याचे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वाहतूक व्यवस्थेला वेगळा आयाम सहा मार्गांचा विकास होणार असल्याने तेथील वाहतूक व्यवस्थेला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग त्या रस्त्यांचा विकास करणार असल्याने त्यांचा दर्जा, गुणवत्ता हा अधिक चांगला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. रस्त्यांचा विकास होणार असल्याने त्या रस्त्यांच्या लगतच्या आणि परिसरतील जमिनींचेही भाव चांगलेच वधारणार असल्याने तेथे रिअल इस्टेटचा व्यवसायही तेजीत येणार आहे. रस्ते चांगले झाल्याने जिल्ह्यातील पर्यटन उद्योग तेजीत येणार आहे. त्यामुळे विविध रोजगारांच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.- अलिबाग-वडखळ २२ किलोमीटर, अलिबाग-रेवस २० किलोमीटर, अलिबाग-बाह्यवळण सुमारे दीड किलोमीटर, सारळ- शिरोली- सहा किलोमीटर, मुरुड- आगारदांडा १० किलोमीटर आणि सारळ- मुरुड ३० असे एकूण तब्बल ९० किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत जाणार आहेत.