आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

By Admin | Updated: August 27, 2015 23:08 IST2015-08-27T23:08:49+5:302015-08-27T23:08:49+5:30

तालुक्यातील २१ केंद्रातील २७८ शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी १ कोटी ८ लाख ७३ हजार

Providing scholarships to tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

कर्जत : तालुक्यातील २१ केंद्रातील २७८ शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी १ कोटी ८ लाख ७३ हजार रु पयांचा निधी धनादेशाद्वारे वाटप करण्यात आला. कर्जत तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सभापती सुवर्णा बांगारे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारंभाची सुरुवात करण्यात आली. उपसभापती मनोहर थोरवे म्हणाले की, शासनाने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार असून पालकांचा शिक्षणाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.
शिक्षकांनीही शिक्षणापासून एकही आदिवासी विद्यार्थी वंचित रहाणार नाही यासाठी प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट केले. सभापती सुवर्णा बांगारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर उपसभापती मनोहर थोरवे, गटविकास अधिकारी अशोक ठुले, सहाय्यक गट विकास अधिकारी महादेव म्हात्रे, गट शिक्षण अधिकारी सुरेश डंबाये आदींसह तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Providing scholarships to tribal students