शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रोहा येथे दबावतंत्राचे राजकारण

By admin | Updated: November 10, 2016 03:33 IST

रोहा नगरपरिषद निवडणुकीत सामान्य मतदार व कार्यकर्त्यांवर दबावतंत्राच्या अस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अगोदरच कोणता झेंडा घेऊ हाती

मिलिंद अष्टिवकर, रोहारोहा नगरपरिषद निवडणुकीत सामान्य मतदार व कार्यकर्त्यांवर दबावतंत्राच्या अस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अगोदरच कोणता झेंडा घेऊ हाती या विवंचनेत असलेल्या मतदार व कार्यकर्त्यांवर बडे नेते व त्यांच्या सहकाऱ्यांकडून धमकावण्याचे प्रकार केले जात आहेत. रोह्यातील प्रमुख पक्षांचे मतदार, कार्यकर्ते व सामान्य नागरिक या हीन प्रकारामुळे पुरते हैराण झाले आहेत. रोहा नगर पालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांपासून असे प्रकार येथे सुरू झालेले असून लोक या दबावतंत्राच्या राजकारणाला कंटाळले असल्याचे दिसून येत आहे.मागील ५ वर्षात ज्या कार्यकर्त्यांकडे ढुंकूनही नेते गणांनी पाहिले नव्हते अशा सर्व कार्यकर्त्यांची आठवण अनेकांना होऊ लागली आहे. काही कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. अशांना दमदाटी होत असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी मतदारांवर दबाव आणला जात आहे. रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीत काम करणारे कर्मचारी व अधिकारी तसेच व्यावसायिक, सरकारी कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांच्यावर प्रमुख पक्षाला मतदान करावे म्हणून दबाव आणला जात आहे. व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर कुणा नागरिकांनी कुणा विरोधी उमेदवाराची एखादी चांगली माहिती टाकली की त्यास त्वरित बोलावून त्यास समज दिली जात आहे. सत्ता नसतानाही सत्तेत असल्यासारखा आव आणून धमकावणे असे प्रकार बडे नेते करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.