शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पोलादपूर तलाठी कार्यालयाचे बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:03 AM

पोलादपूर शहरात बाजारपेठेत असलेल्या तलाठी सजा कार्यालयातील विद्युतपुरवठा जवळपास गेल्या १५ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे.

प्रकाश कदम पोलादपूर : पोलादपूर शहरात बाजारपेठेत असलेल्या तलाठी सजा कार्यालयातील विद्युतपुरवठा जवळपास गेल्या १५ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. मार्च २०१९ पासून ४,१३० रुपये थकीत वीजबिलाबाबत संबंधित यंत्रणेला वारंवार सूचित करण्यात आले. मात्र, तरीदेखील वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की महसूल विभागावर ओढवल्याची समजते.पूर्वी या तलाठी सजा कार्यालयाचे बिल तहसील कार्यालयमार्फत भरले जात असे, त्यानंतर तलाठी व सर्कल हे कॉन्ट्रिब्युट करून बिल भरत असत; पण हा वीज भरणा न झाल्याने महावितरणतर्फे विद्युतपुरवठा थकीत बिलाबाबत संबंधित यंत्रणेला वारंवार सूचित करण्यात आले; परंतु महावितरणच्या बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत या यंत्रणेने आपला कारभार चालूच ठेवला, महावितरणकडून १५ दिवसांपूर्वी कारवाईची नोटीस बजावण्यात आली. मात्र, बिल न भरल्यामुळे महावितरणला येथील विद्युतपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे तलाठी कार्यालयात शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना विनालाइट व विनापंखा उकाड्यामध्ये बसावे लागत आहेत.पोलादपूर बाजारपेठेत रस्त्यालगत असणारे तलाठी सजा कार्यालय येथे जमीन विषयक विविध कामांसाठी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ व महिला मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यातच शेतीविषयक शासनाचा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही नागरिक तलाठी कार्यालयात येत असतात. गेल्या १५ दिवसांपासून मात्र अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे तलाठी सजा कार्यालयात येणाºया नागरिकांना याची विनाकारण शिक्षा भोगावी लागत आहे.>वीज नसल्याने रखडली कामे१५ दिवसांपासून कार्यालयातील वीजपुरवठा थकलेल्या बिलामुळे खंडित करण्यात आलेला आहे, त्यामुळे वीज नसल्याने अनेक कामे रखडत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. भरउन्हात विनापंख्याचे उकडून निघावे लागत आहे. या उकड्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी बाहेर आजूबाजूला सावलीत तलाठी कार्यालयातील कर्मचाºयांची वाट बघत बसावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या हलगर्जीबद्दल नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे तातडीने वीजबिल भरून पुरवठा सुरळीत केला जावा, अशी मागणी होत आहे.