शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आई-मुलाची पोलिसांनी घडवली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:34 AM

अलिबाग परिसरात असलेल्या सुरूची हॅटेलसमोर दीड वर्षाचे मूल रडत असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाला मिळाली.

अलिबाग : अलिबाग परिसरात असलेल्या सुरूची हॅटेलसमोर दीड वर्षाचे मूल रडत असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाला मिळाली. दामिनी पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या दीड वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. त्या मुलाच्या आईचा पत्ता शोधून काढत त्यांच्या ताब्यात दिले. या वेळी मुलाची काळजी घेणाऱ्या महिला पोलिसांचे पूजा कुमार यांनी आभार मानले.ओम्कार कृष्णा कुमार (१८ महिने) असे बालकाचे नाव आहे. ओम्कार कुमार आपल्या वडिलांसमवेत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. परंतु कृष्णा कुमार यांनी नशा येणाºया पदार्थाचे सेवन केले होते. त्यांना नशा जास्त झाल्याने सुरूची हॉटेलच्या आतील गल्लीत कृष्णा आपल्या १८ महिन्यांच्या मुलाला घेऊन पडला. जवळपास दीड तास हा मुलगा घटनास्थळी रडत होता. मात्र त्याच्या जवळ कोणी जात नव्हते. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एका सुजाण नागरिकाने अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या वेळी दामिनी पथकात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपाई सोनम कांबळे आणि अक्षता दांडेकर यांना याबाबत पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. त्यानंतर तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी कृष्णा कुमार हे रस्त्यावर पडले होते तर बाजूला ओम्कार रडत बसला होता. त्यानंतर दामिनी पथकातील अक्षता यांनी त्या बाळाला उचलून घेतले तर सोनम यांनी त्या मुलाला खाऊ देऊन शांत केले. ओम्कारचा पत्ता शोधून काढण्यात व्यत्यय येत होता. मात्र या दोन महिला पोलिसांनी ओम्कारच्या घरचा पत्ता शोधून काढून त्याला त्याच्या आईकडे सुपुर्द केले.