शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सागरी नाकाबंदी; गेटवे-मांडवा, एलिफंटादरम्यान वाहतूक २ दिवस बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:12 IST

PM Modi Mumbai Visit: गेटवे-मांडवा, एलिफंटादरम्यान वाहतूक २ दिवस बंद; २५ हजार अवजड वाहने अडकली 

-  मधुकर ठाकूर लाेकमत न्यूज नेटवर्कउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दोन दिवसांच्या दौऱ्यात सुरक्षिततेसाठी मुंबई गेटवे सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. जेएनपीए बंदर व उरण परिसरातील वाहतूक बंद केल्याने सुमारे २५ हजार अवजड वाहने ठिकठिकाणी अडकून पडली आहेत. 

बुधवारी सकाळपासूनच जेएनपीए व उरण परिसरातील अवजड वाहनांची कंटेनर वाहतूक बंद केली आहे. यामुळे उरण परिसरातील २२ हजार अवजड वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडली असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली. तर जेएनपीए परिसरातही सुमारे तीन हजार अवजड वाहने रस्तोरस्ती उभी असल्याची माहिती जेएनपीटी वाहतूक नियंत्रण विभागाचे वरीष्ठ पाेलिस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी दिली. सुमारे २५ हजार अवजड वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडल्याने बंदरातील मालवाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. 

मालवाहतूक बंद असल्याने मोठा फटका 

गेटवे येथील जलवाहतुकीची नाकाबंदी केली आहे. त्यामुळे गेटवे-एलिफंटा, गेटवे-मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बुधवार, गुरुवारी बंद आहे. सरकारी आदेशानंतर ही वाहतूक बंद केल्याची माहिती गेटवे जलवाहतूक संस्थेचे सचिव इक्बाल मुकादम यांनी दिली. अवजड वाहतूकही बंद असल्याने फटका बसला आहे.

दिबांच्या नावाचा उल्लेख नसल्याने तीव्र नाराजी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लाेकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी साडेतीन वर्षांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. उद्घाटनासाठी करण्यात आलेली बॅनरबाजी आणि होडिंग्ज, विविध फलकांवर दिबांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेल्या नसल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई