शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी आवश्यक तरतूद करणार

By admin | Updated: February 11, 2015 05:38 IST

ज्ञान साधनेचा मार्ग सर्वांसाठी खुला असला पाहिजे. शिक्षणाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे राज्य शासनातर्फे उच्च शिक्षणात

पुणे : ज्ञान साधनेचा मार्ग सर्वांसाठी खुला असला पाहिजे. शिक्षणाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे राज्य शासनातर्फे उच्च शिक्षणात आवश्यक ती आर्थिक तरतूद केली जाईल. त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक येथील उपकेंद्रांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल,असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा ‘जीवनसाधना’ गौरव पुरस्काराचे मुनगंटीवार यांच्या हस्ते लेखक डॉ. अनिल अवचट, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा, सिंधुताई विखे-पाटील, उद्योजक बेबीलाल संचेती, विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, अभिनेता दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठसाहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना वितरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नरेंद्र कडू तसेच विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते. उत्कृष्ट महाविद्यालय,उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराच्या वितरणासह गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे यांना,तर गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार निर्मला यादव, भागोजी हेरकर, संजय वेताळे ,चंद्रकांत शेळके, पांडुरंग बावदाने, चंद्रकांत भोर तसेच गुणवंत कर्मचारी पुरस्कार राजाराम पोटे यांना देण्यात आला.मुनगंटीवार म्हणाले की, जोपर्यंत आमदार किंवा मंत्रीपद आहे तोपर्यंत समाजाचा सेवक म्हणून काम केले पाहिजे. आज केवळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनावरसुमारे ३९ हजार कोटी रुपये खर्च होत आहे,असे असताना शंभरामधील केवळ १२ बारा विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. (प्रतिनिधी)