शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका घेण्यास यंत्रणा सक्षम

By admin | Updated: November 18, 2016 06:16 IST

निवडणुका घेण्याकरिता निवडणूक यंत्रणा सक्षम आणि सज्ज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स.सहारिया यांनी गुरुवारी

अलिबाग : निवडणुका घेण्याकरिता निवडणूक यंत्रणा सक्षम आणि सज्ज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स.सहारिया यांनी गुरुवारी संध्याकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. कोकणातील पालघर, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या संदर्भातील विभागीय आढावा बैठक त्यांनी येथे घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोकणातील या चार जिल्ह्यात सर्वाधिक नऊ नगरपरिषदांच्या निवडणुका रायगड जिल्ह्यात असल्याने आढावा बैठक येथे घेतल्याचे त्यांनी सांगितले.कोकणातील एकू ण ७४ उमेदवार थेट नगराध्यक्षपदाचे आहेत तर ३९६ नगरसेवक पदाकरिता एकू ण १२१६ उमेदवार रिंगणात आहेत. पालघरमध्ये तीन, रायगडमध्ये नऊ, रत्नागिरीमध्ये पाच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार अशा २१ नगरपरिषदांची निवडणूक होत आहे. या सर्व नगरपरिषदांमध्ये रायगडमध्ये सर्वाधिक ८१ प्रभाग आणि सर्वाधिक २५७ मतदान केंद्रे असून एकूण १ लाख ८५ हजार १७० मतदार आहेत. पालघरमध्ये ३ नगरपरिषदांमध्ये ५१ प्रभाग, ५१ मतदान केंद्रे व ९ हजार ४३० मतदार आहेत. रत्नागिरीमध्ये ५ नगरपरिषदांमध्ये ६१ प्रभाग, १५६ मतदान केंद्रे आणि १ लाख १७ हजार २५० मतदार आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ न.पा.मध्ये ४१ प्रभाग, ७४ मतदान केंद्रे आणि ५२ हजार ०६६ मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकू ण १९२ नगरपरिषदा व २० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यातील २५ जिल्ह्यांमधील १४७ नगरपरिषदा व १८ नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे, लातूर या दोन जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांसाठी १४ डिसेंबर २०१६ रोजी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातील २० नगरपरिषदा व २ नगरपंचायतीसाठी १८ डिसेंबर २०१६ रोजी मतदान होत आहे.तर शेवटच्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी ८ जानेवारी २०१७ रोजी मतदान होत असल्याचेही राज्य निवडणूक आयुक्त ज. स.सहारिया यांनी सांगितले. यावेळी आयोगाचे सचिव शेखर चन्ने, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)