गजानन अधिकारी यांची निवड

By Admin | Updated: August 27, 2015 23:02 IST2015-08-27T23:02:25+5:302015-08-27T23:02:25+5:30

माणगांव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी गजानन अधिकारी यांची निवड झाली आहे. येथील उपसभापती अनिल नवगणे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसभापती पद रिक्त झाले

Election of Gajanan Officer | गजानन अधिकारी यांची निवड

गजानन अधिकारी यांची निवड

तळा : माणगांव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी गजानन अधिकारी यांची निवड झाली आहे. येथील उपसभापती अनिल नवगणे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसभापती पद रिक्त झाले होते. या पदाची नुकतीच निवडणूक झाली असून गजानन अधिकारी हे बिनविरोध निवडून आले आहेत. यासाठी मराठा महासंघ इंदापूर विभागातर्फे अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
गजानन अधिकारी हे साई विभागात गेली अनेक वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात नि:स्वार्थी काम करीत आहेत. गजानन अधिकारी यांची उपसभापती निवड म्हणजे आमच्या मराठा महासंघाला उभारी देणारी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मराठा महासंघाचे अध्यक्ष शंकर पवार व खजिनदार सुधीर खैरे यांनी व्यक्त केली. अधिकारी यांच्या पुढील वाटचालीसाठी उपसभापती चंद्रकांत राऊत, अध्यक्ष शंकर पवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Election of Gajanan Officer