पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा

By Admin | Updated: August 27, 2015 23:09 IST2015-08-27T23:09:18+5:302015-08-27T23:09:18+5:30

अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे सुरभी ज्वेलर्सवर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले.

Dacoity at Surabhi Jewelers at Poayanad | पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा

पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा

पाली : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे सुरभी ज्वेलर्सवर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले. पोलिसांनी माहिती मिळताच पाठलाग करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार झाले.
पाली येथील राज्य महामार्गावर पोलिसांनी चोरट्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र एक चोरटा खोपोलीच्या दिशेने पळाला. तातडीने पोलीस निरीक्षक अशोक पवार व सहकाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र पोलीस पाठलाग करत आहे असे लक्षात येताच चोरट्यांनी पेडलीच्या अलिकडील ओंढा रोडकडे गाडी नेली. ही गाडी ओंढा, खांडपोली कलवेकरवाडीपर्यंत गेल्यावर रस्ता नसल्याने पुन्हा वळविण्यात आली. येताना गाडी रस्त्याच्या चिखलात रुतली. गाडी काढण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थ येत असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी सोने व रोख रक्कम घेऊन खांडपोली जंगलात पळ काढला.
ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी आले. गाडीमध्ये राहिलेले नऊ तोळे सोने व गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. खांडपोली येथील जंगलात सुमारे पन्नास पोलीस चोरट्यांचा शोधत घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dacoity at Surabhi Jewelers at Poayanad