शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: October 15, 2015 01:50 IST

तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधलारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला

अलिबाग: तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधलारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. येत्या पाच दिवसांत रस्त्यांच्या कामांना सुरुवात करावी अन्यथा अधिकाऱ्यांना अलिबाग तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात येईल, असा इशाराही कॉंग्रेसने दिला.काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी माजी आमदार मधुकर ठाकूर व काँग्रेस नेते सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवस, कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा, कार्लेखिंड ते हाशिवरे मार्गे रेवस, अलिबाग-वडखळ, अलिबाग-रेवदंडा-मुरूड, अलिबाग-रोहा या रस्त्यांतील खड्डे आणि त्यामुळे पसरलेली धूळ यामुळे श्वसनाच्या विकारांनी आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे काँग्रसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी खोब्रागडे यांच्या निदर्शनास आणून दिले. अलिबाग तालुक्यांतील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर काँग्रेसने अलिबाग-रेवस, कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा येथील धोकादायक खड्ड्यांची चित्रफीतच बांधकाम विभागाकडे सादर केली. या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. निकृष्ट दर्जाची कामे करूनही संबंधित ठेकेदारांविरोधात बांधकाम विभाग कोणतीही कायदेशीर कारवाई करीत नाही. या मार्गांची दुरुस्ती येत्या पाच दिवसांत सुरू झाली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास आपल्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसने निवेदनात दिला आहे. लवकरच कामांना सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन खोब्रागडे यांनी दिल्याटे सुनील थळे यांनी सांगितले.यावेळी युवक काँग्रेसचे रायगड लोकसभा अध्यक्ष अ‍ॅड. उमेश ठाकूर, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, चंद्रकांत खोत, किशोर सातमकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.