शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये आदिवासीवाडीत कुपोषणामुळे बालिकेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 00:54 IST

उपजिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचार

पनवेल : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. अंगणवाड्यांच्या माध्यमातून लहान मुलांना पोषक आहार देण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. मात्र या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना होताना दिसून येत नाही. पनवेल तालुक्यातील वडघर आदिवासी वाडीतील वंदना मनीष पवार (८) या मुलीचा शुक्रवारीकुपोषणाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पनवेलसारख्या शहरी भागापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडघर आदिवासी वाडीतील वंदनाच्या मृत्यूने कुपोषणाची गंभीर बाब समोर आली आहे. वंदनाला घेऊन तिचे पालक शुक्रवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तिची प्रकृती अतिशय नाजूक होती. रुग्णालयातल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला. वंदनाच्या शरीरात रक्तच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना तिला वाचविता आले नाही.

गेल्या दोन महिन्यापासून वंदना आजारी होती. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास १५ दिवस उपचार घेतल्यावर तिला गेल्या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला. मात्र तब्बेत खालावल्याने शुक्रवारी वंदनाचे वडील मनीष पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

वंदना वडघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होती. वडील मनीष पवार हे सिडकोच्या आरोग्य खात्यात घंटा गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना चार मुली व दोन मुले आहेत. पनवेलसारख्या शहरी भागात कुपोषणामुळे बालकांना जीव गमवावा लागतो, म्हणजे आरोग्य विभागाची उदासीनताच म्हणावी लागेल.

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आहेत. याठिकाणी कुपोषित बालकांचा संख्या मोठी आहे. मात्र तालुका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार हे कुपोषण मध्यम स्वरूपाचे आहे. मात्र वंदनाच्या मृत्यूनंतर पनवेल तालुका कुपोषण मुक्तीपासून कोसो दूरच असल्याचे उघड झाले आहे.

कुपोषणाची आकडेवारी नाही

वंदना पवार या बालिकेला कुपोषणाने आपला जीव गमवावा लागला. शहरी भागात कुपोषणाची ही परिस्थिती असेल तर ग्रामीण, आदिवासी भागाचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात ग्रामीण, दुर्गम भागातील सर्वच अंगणवाड्यांमधील मुलांची तातडीने आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.पनवेलमध्ये ६६ मध्यम- स्वरूपाचे कुपोषीत रुग्ण

पनवेल तालुक्यात मध्यम स्वरूपाचे ६६ कुपोषित रुग्ण आहेत तर अतिकुपोषित रुग्णांची संख्या शुन्य आहे.कुपोषणावर मात कारण्यासाठी तालुक्यातील अंगणवाड्यांच्या माध्यमातून नियमित पोषण आहार वितरित केले जात असल्याचे त्यांनी नखाते स्पष्ट केले.- डॉ. सुनील नखाते, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल 

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड