शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

लोहारमाळ येथे सशस्त्र दरोडा

By admin | Updated: November 27, 2015 02:17 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहरमाळ येथे बुधवारी रात्री सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास एका घरावर सशस्त्र दरोडा घालून घरातील तीन लाखांचा ऐवज

महाड/पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहरमाळ येथे बुधवारी रात्री सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास एका घरावर सशस्त्र दरोडा घालून घरातील तीन लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर फरार झाले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. घरातील अन्य दोघांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली. या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून गुरु वारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहम्मद सुएझ हक यांनी घटनास्थळी भेट दिली.महामार्गापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या लोहारमाळ पवारवाडी येथील संदीप नरे यांच्या घरावर हा दरोडा पडला. नरे यांच्या भातगिरणी शेजारीच त्यांचे घर असून भात भरडायचा असल्याचे कारण सांगून एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराकडे आली व संदीप नरे यांच्या आजीने दरवाजा उघडला. त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांच्याकडे पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या त्यावेळी ६ जण घरात घुसले व त्यांनी संदीप नरे व त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरु वात केली. दागिने व पैशांची त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली, त्यावेळी संदीप यांच्या पत्नी समीधा यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी तिच्या डोक्यात लोखंडी शिगेचा प्रहार करून तिला जखमी केले. त्यावेळी कपाटातील सोन्याचे दागिने घेवून चोरटे पसार झाले. नरे यांच्या घरातील आरडाओरड ऐकून शेजारील ग्रामस्थांनी नरे यांच्या घराकडे धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी महामार्गाच्या दिशेने पलायन केले.दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या समीधा नरे यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या दरोड्यात घरातील सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रूपये रोख रक्कम व तीन मोबाइल असा तीन ते साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची फिर्याद पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. दरोड्यांचे सत्र उत्तर रायगडकडून आता दक्षिण रायगडमध्ये सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडालेली आहे. (वार्ताहर)