शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स विरोधातील आंदोलन अखेर ५३ व्या दिवशी स्थगित, पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:45 IST

रिलायन्सच्या वतीने पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने लोकशासनाच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला संघटनेच्या वतीने ५३ व्या दिवशी स्थगिती देण्यात आली.

नागोठणे : पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना रिलायन्समध्ये ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला असून, आज सोमवारी ५३ व्या दिवशी आंदोलनाला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.रिलायन्सच्या वतीने पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने लोकशासनाच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला संघटनेच्या वतीने ५३ व्या दिवशी स्थगिती देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत कोळसे पाटील बोलत होते. या सभेला संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, अध्यक्ष चेतन जाधव, सुरेश कोकाटे, प्रबोधिनी कुथे, मोहन पाटील, उषा दाभाडे, एकनाथ पाटील, सुजित शेलार आदींसह पदाधिकारी आणि हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आपल्याला पूर्ण यश मिळाले नसले तरी लढाई अजून संपलेली नाही. खा. सुनील तटकरे यांनी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला रिलायन्समध्ये नोकरी मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे सांगितले असल्याचे कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले.ज्यांच्या पदरात पडत आहे, त्यांनी उर्वरित लोकांना कंपनीत नोकरी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असा सल्ला यावेळी दिला. ही माघार नाही, तर आपण आज यशस्वी झालो आहोत, असे मी मानतो असे कोळसे पाटील म्हणाले.

‘आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने लढायला शिकविले’- गेल्या दोन वर्षांपासून आपण लढत आहोत. आजचे आंदोलन आपण मागे घेतले नसून, त्याला स्थगिती दिली आहे. आतमध्ये नोकरीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी बाहेरच्या २७५ जणांना कधीही विसरून चालणार नाही. - यांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्याला पुढे लढतच राहायचे आहे. ५३ दिवसांच्या या आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने कसे लढायचे हे नक्कीच शिकवले गेले असल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.‘मागण्या पूर्ण होतील’ आपल्या मागण्या टप्प्याटप्प्याने  पूर्ण केल्या जातील, असा शब्द रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Relianceरिलायन्सagitationआंदोलनEmployeeकर्मचारी