शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा जेट्टीत शौचालय नाही!

By admin | Updated: November 10, 2016 03:36 IST

कोट्यवधी रु पये खर्च करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आगरदांडा येथे भव्य दिव्य स्वरूपात जेट्टी बांधली आहे. परंतु खर्च अमाप मात्र प्रवाशांना कोणतीही सुविधा देण्यात

नांदगाव/ मुरुड : कोट्यवधी रु पये खर्च करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आगरदांडा येथे भव्य दिव्य स्वरूपात जेट्टी बांधली आहे. परंतु खर्च अमाप मात्र प्रवाशांना कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. आज या जेट्टीवरून दिवसाला शेकडोच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत आहेत. जंगल जेट्टीमुळे तर मोठमोठी वाहने ये-जा करून दळणवळणाचे उत्तम साधन प्राप्त झाले आहे. श्रीवर्धन, रत्नागिरी हे अंतर खूप कमी झाले असून बहुतांशी लोक आपली वाहने आगरदांडा जेट्टी येथे नेऊन हा सुखकर प्रवास करीत असतात. एवढी मोठी जेट्टी बांधली परंतु प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा करण्यात न आल्याने आमदार पंडित पाटील यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. या जेट्टीबाबत बोलताना आ. पाटील म्हणाले की, येथून शेकडो प्रवासी प्रवास करतात, परंतु प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात आलेली नाही. तसेच जेट्टी बांधल्यावर आजूबाजूचा काही किलोमीटरचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी ही मेरीटाईम बोर्डाची होती परंतु येथे सुद्धा जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. मोठमोठ्या जेट्ट्या बांधावयाच्या व मूलभूत सुविधा देताना बोर्डाला विसर का पडतो असा प्रतिप्रश्न आमदार पाटील यांनी केला आहे. जेट्टीचे काम होत असतानाच मूलभूत सुविधेकडे लक्ष देणे क्र मप्राप्त होते, परंतु ठेकेदारांना जास्त फायदा कसा होईल याबाबीकडे अधिक लक्ष दिल्याचे त्यांच्या या कृतीमधून दिसून येत आहे. या कामाबाबत माझी स्पष्ट नाराजी असून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून मेरीटाइम बोर्डाला जाब विचारणार असल्याचा स्पष्ट इशारा आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)