कर्जतमध्ये फिल्मी स्टाइलने अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:12 PM2020-02-22T23:12:57+5:302020-02-22T23:13:05+5:30

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तासांत आरोपी गजाआड

Abducted by film style in Karjat | कर्जतमध्ये फिल्मी स्टाइलने अपहरण

कर्जतमध्ये फिल्मी स्टाइलने अपहरण

Next

कर्जत : तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी रात्री अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. उल्हास नदीमध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात येताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

गणेश अनंता घारे (३५) हा आपल्या मित्रांसह २० फेब्रुवारी रोजी रात्री सांगवी येथील उल्हासनदीमध्ये गप्पा मारत बसले होते. अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गणेश गप्पा मारत असताना रात्री अकराच्या दरम्यान नदीलगतच्या रस्त्यावर चार-पाच पांढऱ्या रंगाच्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. त्यातील लोक आपल्याकडे ओरडत येत असल्याने नदीमध्ये बसलेले तिघेही पळू लागले. या वेळी अज्ञातांनी एक किलोमीटर अंतर धावत जाऊन गणेश यांना पकडले आणि गाडीमध्ये टाकून कर्जतच्या दिशेने निघून गेले.

गणेश यांच्याबरोबर असलेल्या तरुणाने घडलेली घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर अपहृत गणेश बंधू योगेश यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे तक्रार केली. याचदरम्यान एक फोन आला आणि तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जतचे पोलीस नेरळ येथे पोहोचले. पोलीस निरीक्षक भोर, पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंदवाडी येथे पोहोचले.

तेथे अपहरण करून आणलेल्या गणेश अनंता घारे यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीच्या बाहेर राजू बबन मरे हे झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार तसेच गणेश घारे यांचे अपहरण करणाºया अन्य पाच जणांना ताब्यात घेतले.

फिल्मी स्टाइलने करण्यात आलेल्या अपहरण प्रकरणी नोंद करण्यात आली. याप्रकरणी राजू बबन मोरे (३९), भूषण विक्रमसिंग राजपूत (२४), नीलेश बुधाजी मोरे(२७), शाहीद आलिम शेख (२३), लखन अशोक गायकवाड (२४), बाळाजी बबन पोल्ले (२९) यांना अटक केली आहे. सर्वांना कर्जत न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Abducted by film style in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.