शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८५ हजार कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन

By admin | Updated: April 28, 2017 00:31 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे ८५ हजार कुटुंबांच्या घरात गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे,

अलिबाग : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे ८५ हजार कुटुंबांच्या घरात गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. गीते यांच्या हस्ते ३० महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. लाभार्थी गॅस कनेक्शन वितरण सोहळा निवडणूक आचारसंहितामुळे लांबला होता. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे बुधवारी हा कार्यक्र म पार पडला.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी गॅस कनेक्शन वितरण सोहळ्याला रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना उपनेते विजय कवळे, अलिबाग तालुका प्रमुख दीपक रानवडे, अलिबाग शहर प्रमुख कमलेश खरवले, संदीप घरत, जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे, अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ, कैलास जगे भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन आॅईल या गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात १ मे रोजी योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील ४ लाख व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहेत. सरासरीनुसार एका कुटुंबात ५ सदस्य गृहीत धरले तर ८५ हजार कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यापैकी १५ हजार ३९५ कुटुंबांना या योजनेचा लाभ रायगड जिल्ह्यात देण्यात आला आहे, असे ही अनंत गीते यांनी सांगितले आहे.रायगड जिल्ह्यातील जनतेने गॅस सबसिडी सोडल्याने ते पैसे सरकारच्या खात्यात जमा होत आहेत. त्यातूनच उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येत आहे. चुलीच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत. या गरीब महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी गॅस कनेक्शन दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला. (प्रतिनिधी)