Zebra Crossing in Pune will now be '3D' | पुण्यातले झेब्रा क्राॅसिंग आता हाेणार 'थ्रीडी'
पुण्यातले झेब्रा क्राॅसिंग आता हाेणार 'थ्रीडी'

पुणे : झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे व्यवस्थित नव्हते. झेब्रा क्राॅसिंग दिसलेच नाही अशी सबब आता पुणेकर वाहनचालकांना सांगता येणार नाही. लांबूणच झेब्रा क्राॅसिंग दिसावे यासाठी पुणे वाहतुक शाखेने एक नामी शक्कल लढवली आहे. पुण्यातील रस्त्यांवर आता थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग तयार करण्यात येणार असून त्यामुळे लांबूणच वाहनचालकांना झेब्रा क्राॅसिंग दिसणार आहे. राज्यात हा प्रयाेग पुण्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. 

पुण्यात वाहनांची संख्या पुण्यातील लाेकसंख्येपेक्षा अधिक आहे. त्यातच नियम माेडणाऱ्यांची संख्या देखील पुण्यात सर्वाधिक आहे. झेब्रा क्राॅसिंगवर थांबणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून वाहतुक पाेलिसांकडून कारवाई करण्यता येते. परंतु अनेकदा झेब्रा क्राॅसिंग दिसलेच नाही, पट्टे अस्पष्ट हाेते अशी सबब सांगत चलन मागे घेण्याची विनंती नागरिकांकडून पाेलिसांना केली जात असे. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग देखील घडले आहेत. त्यामुळे यावर ताेडगा काढत आता वाहतुक पाेलिसांनी थ्रीडी झेब्रा क्राॅसिंगचा प्रयाेग पुण्यात राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे वाहनचालकांना लांबूनच झेब्रा क्राॅसिंग दिसणार असून त्यामुळे वाहनचालक झेब्रा क्राॅसिंगच्या मागे उभे राहण्यास मदत हाेणार आहे. 

याबाबत बाेलताना पुण्याच्या वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, पुण्यात आम्ही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी झेब्रा क्रासिंग उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहाेत. सीसीटिव्हीच्या माध्यमातून झेब्रा क्राॅसिंगवर थांबणाऱ्या वाहनचालकांवर आम्ही कारवाई देखील करत असताे. परंतु अनेक वाहनचालक आपच्याकडे तक्रार करत असतात की आम्हाला झेब्रा क्राॅसिंग दिसले नाही. त्यामुळे पाेलिसांनी  केलेले चलन रद्द करावे. त्यामुळे आम्ही ते झेब्रा क्राॅसिंग अधिक स्पष्ट दिसण्यासाठी थ्री डी झेब्रा क्राॅसिंगचा पर्याय पुढे आणला आहे. असे प्रयाेग युराेपात झाले आहेत. राज्यात पुण्यात पहिल्यांदा हा प्रयाेग पुण्यात हाेताेय. प्रायाेगिग तत्तावर एका रस्त्यावर हा प्रयाेग राबविण्यात येणार असून त्याचा अभ्यास करुन इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 
 

Web Title: Zebra Crossing in Pune will now be '3D'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.