अपघातामुळे तरुणाचा मृत्यु; बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला

By विवेक भुसे | Published: June 7, 2023 04:26 PM2023-06-07T16:26:23+5:302023-06-07T16:26:31+5:30

कारचालक जाणीवपूर्वक रजिस्टर नंबर न लावता चुकीचा नंबर टाकून अपघात झालेली कार फिरवत होता

Youth dies due to accident A car driver with a fake number plate was found | अपघातामुळे तरुणाचा मृत्यु; बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला

अपघातामुळे तरुणाचा मृत्यु; बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला

googlenewsNext

पुणे : आपल्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई होऊ नये, म्हणून अनेक जण नंबरप्लेटमध्ये आकड्यांची आदलाबदल करुन वाहने दामटत असतात. असे एक महाशय असेच बनावट नंबर प्लेट लावून कार फिरवत होते. त्या कारला अपघात होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला. त्यातून त्याचा हा प्रताप उघड झाला.

लोणी काळभोर पोलिसांनी आदिल सिराज मुलाणी (वय २३, रा. दिवे, ता. पुरंदर) या कारचालकाला अटक केली आहे. या अपघातात श्रीधर धर्मा कदम (वय ३३, रा. लोणी गाव) यांचा मृत्यु झाला होता. हा अपघात वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे ४ जून रोजी दुपारी ४ वाजता घडला. याबाबत पोलीस शिपाई अमोल मुंढे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल मुलाणी हा कारचा रजिस्टर नंबर न लावता जाणीवपूर्वक चुकीचा नंबर टाकून ती कार फिरवत होता. फुरसुंगी येथील वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे श्रीधर कदम हे रिक्षातून जात असताना त्यांचा बाहेर तोल गेला. त्याचवेळी पाठीमागून आदिल मुलाणी हा भरधाव कार घेऊन आला. त्याने कदम यांना धडक दिली. त्यात कदम यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी अपघाताची चौकशी केली. तेव्हा आदिल हा बनावट नंबर प्लेट लावून कार चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्या वडिलाने ही जुनी कार खरेदी केली होती. तिचे कर्ज थकल्याने फायनान्सचे लोक त्रास देत असल्याने नंबर प्लेट बदलल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

Web Title: Youth dies due to accident A car driver with a fake number plate was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.