शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीला ओला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने गुंगी येणारे औषध टाकलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीला ओला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खराडी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅबचालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धायरी परिसरातील एका लॉजवर ४ ते ३० मार्च दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आयटी कंपनीत नोकरी करते. तर, आरोपी हा ओला कॅबवर चालक आहे. ४ मार्च रोजी तरुणीने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार आरोपी हा कॅब घेऊन तरुणीला घेण्यासाठी आला. तरुणी मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी तरुणीला तहान लागली होती. तेव्हा कॅबचालकाने तरुणीला गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर तरुणीला गुंगी येऊन ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने तिला धायरी येथील गोकूळ लॉज येथे घेऊन गेला. त्यानंतर तरुणीने कपडे काढून तिचे काढून मोबाईलमध्ये फोटो काढले. काढलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लॉजवर घेऊन जात अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

---------------

तीन पोलीस ठाण्यात धाव

हा प्रकार झाल्यानंतर तरुणीने सुरूवातीला स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलिसांनी या तरुणीला मुंढवा पोलीस ठाण्यात पाठवले. तरुणीने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर तरुणी कॅबमध्ये बसल्याचे ठिकाण हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे तो गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.