तरुणाला व्यसन जडले; रागात पालकांकडून मारहाण, १९ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:41 IST2026-02-23T16:41:20+5:302026-02-23T16:41:58+5:30

पालकांनी केलेल्या या शिक्षेच्या नैराश्यातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली

Young man gets addicted; beaten by parents in anger, 19-year-old takes extreme step | तरुणाला व्यसन जडले; रागात पालकांकडून मारहाण, १९ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

तरुणाला व्यसन जडले; रागात पालकांकडून मारहाण, १९ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सोमेश्वरनगर : व्यसनाच्या कारणावरून आई-वडिलांनी समज दिल्याच्या आणि मारहाण केल्याच्या रागातून चाळीसगाव येथील एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रोहित गोरख राठोड वय १९ रा. चाळीसगाव जि. जळगाव सद्या राहणार सोमेश्वर कारखाना, ऊसतोडणी कामगार वसाहत असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 
           
मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे आई- वडील हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करतात. रोहितला गेल्या काही दिवसांपासून व्यसन जडले होते. मुलाने व्यसन सोडावे आणि आपल्या आयुष्यात स्थिर व्हावे, अशी त्याच्या पालकांची प्रामाणिक इच्छा होती. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असत. घटनेच्या दिवशी रोहित व्यसनाच्या नशेत असल्याने पालकांनी त्याला कठोर शब्दांत सुनावले आणि रागारागात मारहाण केली. पालकांनी केलेल्या या शिक्षेचा रोहितने प्रचंड मानसिक त्रास करून घेतला. या नैराश्यातून त्याने राहत्या कोपीबाहेरील सोमेश्वर कारखान्याची पाण्याच्या खाणीला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सोमेश्वर कारखान्याच्या रुग्णवाहिकेने त्याचा मृतदेह चाळीसगाव येथे नेण्यात आला. अवघ्या १९ व्या वर्षी रोहितने आपले आयुष्य संपवल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : नशे की लत पर माता-पिता की डांट से क्षुब्ध किशोर ने की आत्महत्या

Web Summary : चालीसगाँव में 19 वर्षीय युवक ने नशे की लत के कारण माता-पिता द्वारा डांटे जाने और पीटे जाने के बाद आत्महत्या कर ली। माता-पिता के अनुशासन से परेशान होकर उसने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Teen Commits Suicide After Scolding, Beating by Parents Over Addiction

Web Summary : A 19-year-old in Chalisgaon ended his life after being scolded and beaten by his parents for his addiction. Upset by the parental discipline, he committed suicide by hanging himself. Police are investigating the case.