शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

Weather Alert: देशभरात यंदाचा मान्सून सुसाट! जूनपर्यंत सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 7:13 PM

मध्य भारतात जोरदार तर सौराष्ट्र, ईशान्य, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेशात कमी

ठळक मुद्देमहाराष्ट्रामध्ये कोकणात सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १११ टक्के पाऊस झाला आहे

पुणे: यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा अधिक वेगाने देशभराच्या विविध भागात आगमन केल्याने देशात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. सौराष्ट्र, कच्छ, ईशान्यकडील राज्ये, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी या भागात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. २० जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

मध्य भारतात सर्वाधिक पाऊस झाला आहे. देशभरातील ३६ हवामान विभागापैकी ८ विभागात सरासरीपेक्षा - २० ते ६० टक्के कमी पाऊस झाला आहे. तर १९ विभागात सरासरीच्या तुलनेत १६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ५ विभागात सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाला आहे. ४ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे.

मॉन्सूनचे यंदा आगमन हे पश्चिमेकडून लक्ष्यद्वीपकडून झाले. तरीही त्यानंतर लक्ष्यद्वीप समुहावर मॉन्सूनच्या पावसाचा जोर राहिला नाही. त्यामुळे लक्ष्यद्वीपला सरासरीपेक्षा ४७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये नेहमीपेक्षा ३ दिवस उशीरा आगमन झाले. आगमनानंतर पावसात खंड पडल्याने केरळमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा -१५ कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सौराष्ट्र, कच्छ परिसरात शनिवारी मॉन्सूनचे नेहमीपेक्षा अगोदर आगमन झाले आहे. या भागातही -३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. जम्मू काश्मीर - २६ टक्के, अरुणाचल प्रदेश - २३, आसाम, मेघालय - २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशभरात सर्वाधिक पाऊस पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा तब्बल २२५ टक्के अधिक झाला आहे. पूर्व मध्य प्रदेश १६० टक्के, बिहार १४९ टक्के, उत्तराखंड १२८ टक्के पाऊस झाला आहे. पश्चिम राजस्थानात अजून मॉन्सून पोहचला नाही. तरीही तेथे सरासरीपेक्षा ११० टक्के पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रात कोकणात सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १११ टक्के पाऊस झाला आहे. राज्याच्या चारही हवामान विभागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे.

१ जून ते २० जूनपर्यंत राज्यात पडलेला पाऊस (मिमी)

विभाग                  प्रत्यक्ष पडलेला पाऊस  सरासरी पाऊस  टक्केवारी

कोकण                                      ७३५.९             ३४९.२             १११

मध्य महाराष्ट्र                          १५२.४             ८६.२७             ७६

मराठवाडा                                     १३१             ७९.७             ६५

विदर्भ                                          १४५              ७९.४             ८३

चार जिल्ह्यात कमी पाऊस

धुळे -२९ टक्के, नंदुरबार -४६ टक्के, सोलापूर - ५ टक्के, अकोला - ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा खुप अधिक पाऊस झाला आहे. मुंबई उपनगर भागात सरासरीपेक्षा २१३ टक्के, कोल्हापूर २०० टक्के, सांगली १८०, सातारा १७६ टक्के, पुणे १२७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भातील चंद्रपूर १२४ टक्के, यवतमाळ ११३ टक्के आणि परभणी १३९ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीweatherहवामान