Join us  

लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

 सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून प्रत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 8:00 PM

Open in App

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : हैदराबादमध्ये काल धो धो पाऊस पडल्याने आजच्या सामन्यावरही प्रश्नचिन्ह होत, पण मॅच वेळेत सुरू झाली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून प्रत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत. SRH चौथ्या ( -०.०६५) आणि LSG सहाव्या ( -०.३७१) क्रमांकावर आहेत. आजचा सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल आणि ते अव्वल चारमध्ये पोहोचतील आणि चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर फेकला जाईल, जो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

Milestones Alert:हेनरिच क्लासेनला आयपीएलमध्ये पन्नास चौकार पूर्ण करण्यासाठी १ चेंडू सीमापार पाठवायचा आहेलोकेश राहुलला आयपीएलमध्ये ४०० चौकार पूर्ण करण्याची संधी आहे आणि तो ५ चौकार दूर आहेनिकोलस पूरन व दीपक हुडा यांनाही १०० चौकार पूर्ण करण्यासाठी ५ चौकार हवे आहेत SRH चा ओपनर अभिषेक शर्मा याचा हा १०० वा ट्वेंटी-२० सामना आहे.  लखनौचा कर्णधार लोकेश राहुल याने टॉस जिंकून हैदराबादला लक्ष्याचा पाठलाग करण्याचे आव्हान दिले. LSG च्या ताफ्यात क्विंटन डी कॉक परतला आहे, तर मोहसिन खानला दुखापतीमुळे मुकावे लागले आहे. SRH नेही मयांक अग्रवाल व मार्को यान्सेन यांच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सनवीर सिंग व विजयकांथ वियाशकांत यांना संधी दिली आहे. लोकेशने दुसऱ्या षटकात पॅट कमिन्सना मारलेला लॉफ्टेड सिक्स पाहण्यासारखा होता. तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने पुल शॉट खेचला, परंतु नितिश कुमार रेड्डीने सीमेवर अविश्वसनीय झेल टिपला. भुवीच्या पुढच्या षटकात सनवीर सिंगने अफलातून झेल घेताना मार्कस स्टॉयनिसला ( ३) बाद केले.  अम्पायरच्या निर्णयावर स्टॉयनिसने अम्पायरसोबत हुज्जत घातलेली दिसली. 

टॅग्स :आयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्ससनरायझर्स हैदराबादभुवनेश्वर कुमार