Join us  

Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:02 PM

Air India Express Flights Cancel: अनेक कर्मचारी एकाच वेळी रजेवर गेल्यामुळे बुधवारी कंपनीला आपल्या 80 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या.

Air India Express Flights Cancel: टाटा ग्रुपची विमान कंपनी Air India Express अडचणीत आली आहे. कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा फटका विमान कंपनीला बसत आहे. अनेक कर्मचारी एकाच वेळी रजेवर गेल्यामुळे बुधवारी एअरलाईनला आपल्या 80 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या. उड्डाणे विलंब आणि रद्द केल्याबद्दल कंपनीने प्रवाशांची माफीही मागितली. कंपनीने आश्वासन दिले की, ते या समस्येचे लवकरच तोडगा काढतील आणि तिकीटाची संपूर्ण रक्कम प्रवाशांना परत केली जाईल. 

उड्डाणे का रद्द केली एअर एशिया इंडियाचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीन होणार आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही क्रू मेंबर्समध्ये नाराज झाले आहेत. क्रू मेंबर्स आणि ग्राउंड स्टाफच्या नाराजीमुळे आज अनेक कर्मचारी अचानक रजेवर गेले आणि त्यामुळेच एअरलाईन्सची 80 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

सरकारने फटकारलेयाप्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपनीला फटकारले आहे आणि हा वाद लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले आहे. DGCA च्या नियमानुसार प्रवाशांना योग्य सुविधा देण्याच्या सूचनाही सरकारने कंपनीला दिल्या आहेत. या संपूर्ण वादावर नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्सप्रेसकडून सविस्तर अहवालदेखील मागवला आहे.

तिकिटाचे पैसे परत कसे मिळवायचेएअर इंडिया एक्स्प्रेसने प्रवाशांना कोणतेही शुल्क न आकारता तिकीट रिफंड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही तिकिटाचे पैसे परत घेऊ शकता किंवा इतर तारखेसाठी दुसरे तिकीट शेड्यूल करू शकता. यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपद्वारेही विनंती करू शकता. तुम्ही TIA शी WhatsApp किंवा http://airindiaexpress.com/support वर संपर्क करून तुमचा परतावा मिळवू शकता.

टॅग्स :एअर इंडियाव्यवसायगुंतवणूक