शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत साखर कारखान्याचे धुराडे पेटेना!

By admin | Updated: August 14, 2015 03:17 IST

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीनविक्री प्रक्रिया ग्राहक मिळत नसल्याने खोळबंली आहे. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे़

लोणी काळभोर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीनविक्री प्रक्रिया ग्राहक मिळत नसल्याने खोळबंली आहे. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे़ एकीकडे यशवंतचे धुराडे पेटण्याचे नाव घेत नसून, दुसरीकडे उसाला कोणीही विचारेनासे झाल्याने शेतकरी सभासद व कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे़ यशवंतच्या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टीचालक व गुऱ्हाळचालक टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे उंबरे झिजवावे लागत असून, बाजारभाव व ऊसबिलाची खात्री नसतानाही केवळ नाइलाज म्हणून शेतकऱ्यांना कुट्टी व गुऱ्हाळ मालकांची मनधरणी करावी लागत आहे़ या कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल झाला असून, ‘यशवंत सुरू करण्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घ्या; परंतु कारखाना सुरू करून येथील शेतकऱ्यांचे संसार वाचवा,’ अशी भावना व्यक्त होत आहे.कारखान्याच्या मालकीच्या ११३़१८ एकर जमिनीची विक्री करून बँकेची देणी भागवून उर्वरित रकमेतून कारखाना सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु जमीनविक्री प्रक्रियेत कुठं घोडं अडतंय, हे न सुटणारे कोडे असून राजकीय पटलावर काही हालचाली होऊन खोडा निर्माण झाल्यामुळे ‘म्हाडा’च्या फायलीपासून रोडावलेल्या विक्रीप्रक्रियेचे गाडे पुढे न सरकल्याने यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, हे कोणालाही समजेनासे झाले आहे. सुमारे २०हजार सभासद व एक हजार कामगारांच्या कुटुंबांच्या चुलीशी निगडित असलेला साखर कारखाना अडचणीत असून, अखेरच्या घटका मोजत आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक राहिले नसून, काही वर्षांपासून फक्त यशवंतचा राजकीय सोयीनुसार तालुक्यातील व जिल्ह्यातील पुढारी वापर करीत आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकयांची झोळी अजून रिकामी असून, फक्त खोट्या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात येत आहे. प्रतिएकर दोन कोटी रुपये हा जाहीर केलेला दर राज्य बॅँक संचालक मंडळाच्या बैठकीत कमी करून पुन्हा नव्याने टेंडर मागविणार असल्याचे राज्य बॅँकेकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)