शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासाठी कार्य करणे कर्मयोग

By admin | Updated: February 5, 2015 00:19 IST

मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्त्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दु:खमय झाले आहे.

पुणे : मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्त्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दु:खमय झाले आहे. आनंदी जीवनाकरिता पक्षी, प्राणी आणि इतर जीवजंतूंसह समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. विश्वकल्याणासाठी कार्य करणे हाच खरा कर्मयोग आहे, असे मत गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी व्यक्त केले.गुरुतत्त्वयोग संस्थेच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट माण, लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्था, वाघोली यांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत देण्यात आली. चैतन्य ट्रस्टच्या नलिनी इनामदार, अंध-अपंग संस्थेचे अर्जुन केंद्रे, ज्ञानेश्वर केंद्रे यांनी मदत स्वीकारली. गुरुतत्त्वयोगचे प्रमुख विश्वस्त श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते ‘गुरुतत्त्ववेध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सरदार म्हणाले, ‘‘गुरुतत्त्वयोग हा विशिष्ट वंश, जात, धर्म, पंथ, समाज यांपुरता मर्यादित नसून प्राणिमात्रा, वनस्पतींनाही त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो. गुरुतत्त्व आपल्याला नकळतपणे जगण्याचे धडे देत असते. यासाठी मानवी गुरुची आवश्यकता असतेच, असे नाही. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, अनुभव आपल्याला शिकवीत असून, त्यामधील गुरुतत्त्वाशी सुसंवाद साधून शिकणे आवश्यक आहे.’’‘गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानाची ओळख’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये माणसांमधील सहजप्रकृती, शरणागतसाधना आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. मानसी मांडे यांनी प्रास्ताविक केले. तेजा दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)ओळख उत्तुंग भरारी घेणाऱ्यांची४अपंग व्यक्तींनी परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश व त्या वेळी त्यांना मिळालेली गुरुतत्त्वाची साथ याविषयीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये हेलेन केलर, मुरलीकांत पेटकर, गिरीश शर्मा, टेम्पल ग्रांडीन, हेन्री फोर्ड, वॉल्ट डिस्रे, गौरी गाडगीळ आदींच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.