बायको फोनवर I Love You बोलली नाही म्हणून मारहाण, नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: March 2, 2024 15:46 IST2024-03-02T15:46:01+5:302024-03-02T15:46:45+5:30

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे....

Wife beaten for not saying I love you on phone, case filed against husband | बायको फोनवर I Love You बोलली नाही म्हणून मारहाण, नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

बायको फोनवर I Love You बोलली नाही म्हणून मारहाण, नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : बहिण्याच्या घरी गेलेल्या पत्नीने फोनवर आय लव्ह यू म्हटले नाही, याची राग मनात धरुन पतीने पत्नीला बांबूने बेदम मारहाण केली. यानंतर झाडावर ढकलून देत शिवीगाळ केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दांपत्य लेक डाऊन सोसायटी वास्तव्यास आहे. पत्नी काही कामानिमित्त तीच्या बहिणीला भेटायला गेली होती. यावेळी घरी आलेल्या पतीने तीला दारूच्या नशेत फोन केला. तीला फोनवर आय लव्ह यु बोलण्याचा आग्रह केला. मात्र पत्नीने बहिणीसमोर असे बोलण्यास नकार देत फोन ठेऊन दिला.

यानंतर पत्नी घरी परतल्यावर पतीने तीला आय लव्ह यू का बोलली नाही? असा जाब विचारला. तसेच तिला बांबूने मारहाण करत एका झाडावर ढकलून दिले. दुखापत झाल्याने पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार गोपाळ माने करत आहेत.

Web Title: Wife beaten for not saying I love you on phone, case filed against husband