शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नाती निभावताना कायद्याची गरज का पडते? डॉ. शालिनी फणसळकर- जोशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:53 IST

कुटुंब व कायदा या दोन गोष्टी कधीच जुळू शकत नाहीत़...

पुणे : कुटुंब व कायदा या दोन गोष्टी कधीच जुळू शकत नाहीत़. जे नाते कायद्यावर आधारितच नाही, ते कायद्याने जोडू अथवा तूटू शकत नाही़ त्यामुळे नाती निभावताना आपल्याला कायद्याची गरज का पडते, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ़ शालिनी फणसळकर-जोशी यांनी उपस्थित केला़     कुटुंब कायदा : समज-गैरसमज या विषयाच्या अनुषंगाने, कुटुंब कायदेविषयक माहिती आणि जनजागृतीपर युट्यूबवरील व्हिडिओजचे विमोचन आणि लोकार्पण सोहळा डॉ़ फणसळकर-जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला़ यावेळी अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे उपस्थित होत्या़ अ‍ॅड़ भूषण कुलकर्णी यांनी या व्हिडिओज तयार केले आहेत़    डॉ़.फ़णसळकर-जोशी म्हणाल्या, कुटुंब म्हणजे भावना, जन्मोजन्मीची नाती़ व कायदा म्हणजे रूक्ष व्यवहार होय़.  कुटुंब कायद्यात जो जिंकतो तो कधीच जिंकलेला नसतो तर समोरच्याबरोबरच तो व त्याचे कुटुंबही हरलेले असते़. त्यामुळे कायदा आपण कुटुंबाच्या बाहेरच ठेवला पाहिजे़.     आमच्या समोर घटस्फोटाचे दावे येतात तेव्हा, त्या पती-पत्नीमधील भांडणाचा त्यांचा मुलांवर होणारा मानसिक परिणाम हा विचार करायला लावणारा असतो़ असे सांगून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी, कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करताना आम्हा न्यायधीशांना एखाद्याच्या बाजूने निकाल देण्यात कधीच आंनद होत नसल्याचे सांगितले़. या दाव्यांमध्ये त्या कुटुंबाला एकत्र कसे आणता येईल ते आम्ही प्राधान्याने पाहतो़. कुटुंब कायदा यातील मूळ उद्देश हा भांडणांतून मार्ग काढून त्यांना एकत्र आणणे हाच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़.     अ‍ॅड. भूषण कुलकर्णी यांनी हे व्हिडिओ तयार करण्यामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता जोशी यांनी केले तर, आभार श्रेयस कुलकर्णी यांनी मानले़. ================

संभाषण सुखी कुटुंबाची किल्लीआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘व्हॉटअप’, व्टिटर, फेसबुक यामुळे नवरा-बायको, आई-वडिल मुलांमधील संभाषण कमी झाले आहे़ कुठेही पाहिले तर प्रत्येक जण यामध्येच गुरफटलेला असतो़ कुटुंबातील तसेच नवरा-बायकोमधील संभाषण संपुष्टात आले असून नाती दूरावली आहेत़ मात्र संभाषणच एकमेकांना जवळ आणू शकते व संभाषण हीच सुखी कुटुंबाची किल्ली आहे़ असे मत न्यायमुर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयrelationshipरिलेशनशिप