शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना सरपंचासह दोघांना रंगेहाथ पकडले

By admin | Updated: October 7, 2015 04:08 IST

रस्त्याच्या कामाचे थकीत बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून २७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना कालठण नं. १ (ता. इंदापूर) येथील महिला सरपंचाचा मुलगा व ग्रामसेवकाला

इंदापूर : रस्त्याच्या कामाचे थकीत बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून २७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना कालठण नं. १ (ता. इंदापूर) येथील महिला सरपंचाचा मुलगा व ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहाथ पकडले. त्या दोघांसह लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याबद्दल महिला सरपंचावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. सरपंच सुरेखा सुधाकर चव्हाण (वय ५५, रा. कालठण नं. १), तिचा मुलगा अमित सुधाकर चव्हाण (वय ३०), ग्रामसेवक पवनकुमार सुभाषचंद्र भालेराव (वय ४९, रा. सोनाईनगर, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.सविस्तर हकिगत अशी, की लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या ठेकेदाराने कालठण नं. १ मधील रस्त्याचे काम केले होते. त्या कामाचे पाच लाख रुपयांचे बिल थकीत होते. ते काढून देण्यासाठी महिला सरपंच सुरेखा चव्हाण हिने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ग्रामसेवक पवनकुमार भालेराव याने अडीच हजार रुपये मागितले होते. या ठेकेदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि. ६) सकाळपासूनच सापळा रचला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाचा मुलगा अमित चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर गलांडवाडी नं. १ गावाच्या हद्दीतील सोनाज पेट्रोल पंपाजवळच्या हॉटेल सौरभमध्ये अडीच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक पवनकुमार भालेराव याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारण्यास संमती दिल्याच्या आरोपावरून सरपंच सुरेखा चव्हाण हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.