शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांकडे बेहिशेबी मालमत्ता येते कुठून?

By admin | Updated: May 30, 2014 04:48 IST

अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाचे तात्कालीन उपायुक्त रमेश शेलार यांचे वारजे माळवाडी येथील एका इमारतीत १३ फ्लॅट असून, त्याचा मिळकत कर चुकविल्याप्रकरणाची महापालिकेची खातेनिहाय चौकशी सुरू आहे

पुणे : अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाचे तात्कालीन उपायुक्त रमेश शेलार यांचे वारजे माळवाडी येथील एका इमारतीत १३ फ्लॅट असून, त्याचा मिळकत कर चुकविल्याप्रकरणाची महापालिकेची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात आणखी बेहिशेबी संपत्ती त्यांच्याकडे मिळाली. महापालिकेतील शेलार हे सापडले म्हणून ते चोर मानले, तर आणखी किती अधिकारी शिरजोर असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. महापालिकेतील बांधकाम, मिळकत कर, अतिक्रमण हे प्रमुख विभाग ‘मलई’चे मानले जातात. त्याठिकाणी बदलीसाठी अनेक अधिकारी व सेवक लॉबिंग करतात. तसेच, नगरसेवक व आमदारही त्यांच्या मर्जीतील अधिकार्‍यांसाठी आग्रही असतात. अनेक दिवस एकाच विभागात ठाण मांडून असलेले अधिकार्‍यांचे सेवकही त्यांच्याबरोबरच असतात. त्यामुळे गैरव्यवहार व भ्रष्टाचाराला आणखी खतपाणी मिळत जाते. महापालिकेत दर तीन वर्षांनंतर अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची बदली होणे अपेक्षित आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारी व माननीयांच्या मर्जीतील सेवकांची केवळ कागदोपत्री बदली होते. अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत राहिल्याने विविध मार्गाने फायलींची अडवणूक करून एजंटाच्या मदतीने माया जमविली जाते. त्यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते शिपायांपर्यंत सर्वच सहभागी असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’द्वारे बेहिशेबी मालमत्ता गोळा केली जाते. अतिक्रमण विभागाचे प्रमुख असलेले शेलार यांनी वारजे माळवाडी येथील सरस्वती अपार्टमेंटमध्ये १३ सदनिका घेतल्या. परंतु, सर्व सदनिकांचा मिळकत कर २००३ पासून ते २०१३ पर्यंत थकविला होता. अखेर एक तक्रारीनंतर नोटीस मिळाल्याने ऐकावेळी त्यांच्या पत्नीच्या नावाने १३ फ्लॅटचा सुमारे ६ लाखाचा मिळकत कराचा भरणा जूनमध्ये करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यावेळी मिळकत कर थकबाकी, तळमजल्यावर अनधिकृत बांधकाम, पहिल्या मजल्याचा व्यावसायिक वापर आणि इमारतीवर दोन विनापरवाना मोबाईल टॉवर उभारल्याचे प्रकरण उजेडात आले. मात्र, आयुक्त महेश पाठक यांनी केवळ दक्षता विभागामार्फत चौकशीचे वर्षभरापूर्वी दिले. मात्र, ही चौकशी अद्याप पूर्ण झाली नसून, शेलार हे पुन्हा मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून महापालिकेत कार्यरत आहेत. गैरप्रकार सापडल्यानंतरही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून संरक्षण दिले जात असल्याने महापालिकेतील भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. (प्रतिनिधी)