WhatsApp Admin Alert; Watch on you by police | व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन सावधान; तुमच्यावर आहे पोलिसांचा 'वॉच'

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन सावधान; तुमच्यावर आहे पोलिसांचा 'वॉच'

ठळक मुद्देसमाजात तेढ निर्माण करणारा मेसेज गुन्हा

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असणे आता जबाबदारीचे होणार आहे. एखाद्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून समाजात तेढ निर्माण करणारा मेसेज टाकला तर त्या अ‍ॅडमिनला आता जेलचीच हवा खावी लागणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला  आहे. 
कोरोना विषाणू उद्रेकानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात  आले आहे. मात्र, मोकळ्या वेळेत काही विघ्नसंतोषींकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यावर आता पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. सायबर गुन्हा म्हणून याची नोंद होणार आहे. वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनचीच जबाबदारी असणार आहे. 
आता केवळ ग्रुप तयार करून अ‍ॅडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत़ अ‍ॅडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे़ त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण्याची वेळ  येऊ शकते़.......
अफवा टाळण्यासाठी एका वेळी एकाच  ग्रुपवर पाठविता येणार मेसेज 
व्हॉट्सअ‍ॅपवर पसरणाºया अफवा टाळण्यासाठी खूप जास्त फॉरवर्ड होणाºया मेसेजला ह्यडबल अ‍ॅरोह्ण चा मार्क येणार आहे. हा मार्क असलेला मेसेज एका वेळी एकाच ग्रुपवर पाठविता येईल. कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जात असलेल्या अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीद्वारेच हा निर्णय घेण्यात आला  आहे. काही मेसेजेस अनेक ग्रुपवर पाठवून त्याद्वारे अफवा पसरविल्या जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
........
* कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, भाषा इत्यादी कारणांनी वैरभाव वाढवू शकेल, अशी कोणतीही पोस्ट पाठविता येणार नाही. देशद्रोही, जातीयवादी किंवा वर्णद्वेष पसरविणारे मेसेज टाकल्यास तो गुन्हा होणार आहे. 
.............
* व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनलाच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना लगाम घालावा लागणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून असा प्रकार घडल्यास पोलिसांना कळविणे हे त्याचे कर्तव्य असणार आहे. कोणाचीही बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. 
........
* सोशल मीडिया नेटवर्किंग साइट्सवर काहीही टाकले तरी आपण वाचू शकतो, असे अनेकांना वाटते. याचे कारण यातून ओळख उघड होत नाही, असे वाटते. मात्र, इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे पुरावे गोळा करणे शक्य असते. त्यामुळे गैरकृत्य करणाºयांना शोधून शिक्षा करता येणे पोलिसांसाठी सोपे होणार आहे
............
* कोणाच्या परवानगीशिवाय फोटो काढणे आणि ती व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरविणे हादेखील गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फोटो काढणे टाळायला हवे. तसेच एखाद्याचा फोटो डीपी म्हणून ठेवणेदेखील बेकायदा असणार आहे. 
............

* व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, ही काळजी घ्याच
1 - व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपमधील प्रत्येक सभासद हा विश्वासार्ह आहे, ही काळजी घेण्याची गरज आहे. 
2- गैर वागणाऱ्या सदस्यांबाबत पोलिसांना त्वरित माहिती देण्याची गरज आहे. 
3-व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनने आपल्या गु्रपमधील सर्व सदस्यांना यासंदर्भातील कायदा आणि नियमांची माहिती द्यायला हवी.  तसा मेसेज ग्रुपवर टाकायला हवा. 
4- अ‍ॅडमिनने सातत्याने ग्रुपवर काय प्रकारचा मजकूर प्रसारित होत आहे, याची काळजी घ्यायला हवी. 
...............

कायदा काय सांगतो 
भारतीय दंडविधानसंहिता (इंडियन पिनल कोड-  आयपीसी) १५३ ए नुसार धर्म, जात, वंश, भाषा, जन्म ठिकाण, रहिवासाचे ठिकाण आदींवरून समाजात तेढ निर्माण होईल, वैरभाव निर्माण होईल आणि त्यातून समाजाच्या एकोप्याला तडा जाईल, असे मेसेज पाठविणे गुन्हा आहे. या प्रकारच्या गुन्ह्यासाठी तीन ते पाच वर्षे कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WhatsApp Admin Alert; Watch on you by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.