"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:20 PM2024-05-22T15:20:00+5:302024-05-22T15:23:18+5:30

ही १९ तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी देत आहे, त्यामध्ये कलम ३०४ आधीपासूनच आहे, असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

What Fadnavis said is true here is the proof bjp leader Muralidhar Mohols counter attack on ravindra Dhangekar | "फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

Murlidhar Mohol ( Marathi News ) :पुणे अपघात प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीलाच आरोपीवर कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. या आरोपाला आता भाजप नेते आणि धंगेकरांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच केलं आहे," असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांवर निशाणा साधला आहे. 

रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोप खोडून काढताना मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे की, "कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच! ही १९ तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी देत आहे, त्यामध्ये कलम ३०४ आधीपासूनच आहे," असा दावा मोहोळ यांनी केला आहे.

दरम्यान, "साप-साप म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत," असा टोलाही मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.

रवींद्र धंगेकरांनी नेमकं काय म्हटलं होतं?

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिशाभूल केल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे की, "काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर ३०४ अ सोबतच ३०४ हे कलम लावण्यात आले. राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR कॉपी बदलल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?" असा खोचक सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: What Fadnavis said is true here is the proof bjp leader Muralidhar Mohols counter attack on ravindra Dhangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.