भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो; बारामतीत संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:55 PM2023-01-03T14:55:24+5:302023-01-03T14:55:31+5:30

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य वाचवणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे, स्वराज्य रक्षक आणि स्वराज्यवीरच आहेत.

We condemn BJP dirty politics Clear role of Sambhaji Brigade in Baramati | भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो; बारामतीत संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो; बारामतीत संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

googlenewsNext

बारामती : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत ,अशी भूमिका संभाजी ब्रिगेड ने मांडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग झाले आहे .या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड चे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी संभाजी ब्रिगेड ची भूमिका स्पष्ट केली आहे .         

काटे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेतून ग्रंथ लिहिला होता. अनेक विविध विषयावरती छत्रपती संभाजी महाराजांनी लेखन केलेला आहे .ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या. छत्रपती संभाजी महाराज उत्तम इंग्रजीचे जाणकार व भाष्यकार होते.  छत्रपती संभाजी महाराज यांचा लढा हा कोणत्याही धर्मासाठी जातीसाठी नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज,  छत्रपती ताराराणी , त्याचबरोबर स्वराज्यातील सर्वच मावळ्यांचा लढा स्वराज्याच्या विस्तारासाठी होता. म्हणूनच तंजावर पासून पेशावर पर्यंत स्वराज्य उभा राहिले होते. शिवरायांच्या शंभूराजांच्या सैन्य दलामध्ये विविध जातीच्या विविध धर्माचे विविध पदाधिकारी व अधिकारी होते. याचे अनेक पुरावे आणि अनेक दाखले इतिहासकारांनी आजपर्यंत अनेक वेळा समोर ठेवलेले आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करताना स्वराज्य वीर असा केला. औरंगजेब, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इंग्रज यापासून स्वराज्य वाचवणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणि स्वराज्यवीरच आहेत.
      
जाती धर्माच्या अस्मितेवरून व महापुरुषांच्या प्रतिष्ठेवरून भाजपकडून नेहमीच राजकारणाची परिसीमा ओलांडली या भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही संभाजी ब्रिगेड कडून निषेध करतो. भाजप ला छत्रपती संभाजी राजें बद्दल खरच प्रेम असेल तर ज्या गोळवलकर गुरुजीने बंच ॲाफ थॅाट मध्ये शंभुराजेंची बदनामी केली ,ते पुस्तक तुम्ही जाळणार का? ही संभाजी ब्रिगेडचे अधिकृत भूमिका असल्याचे  संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितले.

Web Title: We condemn BJP dirty politics Clear role of Sambhaji Brigade in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.