शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: आम्हाला डावललं जातंय! निवडणुकीत ब्राह्मण समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्या; समाजाचे सर्व पक्षांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:18 IST

विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले

पुणे : शहरात ब्राह्मण मतदारांची संख्या सुमारे १६ ते १८ टक्के इतकी असतानाही राजकीय पक्षांकडून सातत्याने ब्राह्मण उमेदवारांना डावलले जात असल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजाला योग्य व पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने बुधवारी (दि.२४) करण्यात आले. या वेळी समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सह-समन्वयक अॅड. ईशानी जोशी, प्रवक्ते विश्वजीत देशपांडे, राजकीय समितीचे सदस्य विश्वनाथ भालेराव, मंदार रेडे, सुनील पारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाजातील सुमारे ५० कार्यकर्ते निवडून आले आहेत. एकट्या मराठवाड्यात पाच ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष निवडून आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच कोकण, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने ब्राह्मण उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवून चांगला प्रतिसाद मिळविला होता. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्येही असेच परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी ब्राह्मण बहुल प्रभागांमध्ये ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी आग्रहाची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सुमारे ३० संभाव्य उमेदवारांची यादीही दिली आहे. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तसेच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनाही याबाबत आवाहन करण्यात आले असून, काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील नेत्यांचीही लवकरच भेट घेण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Brahmin Community Seeks Representation in PMC Election 2026

Web Summary : Pune's Brahmin community, feeling underrepresented, urges all political parties to prioritize Brahmin candidates in the upcoming PMC elections, especially in Brahmin-majority areas. They've submitted a list of potential candidates and seek fair representation across parties.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६brahman mahasanghब्राह्मण महासंघElectionनिवडणूक 2025PoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस