पुण्यातील वडगाव जलकेंद्राचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 09:36 IST2026-02-11T09:35:39+5:302026-02-11T09:36:28+5:30
शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुण्यातील वडगाव जलकेंद्राचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
पुणे : रॉ वॉटर पाइपलाइनवर डमी प्लेट (बंद प्लेट) बसवण्यासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन नवीन मीटरिंग युनिट (किऑस्क) बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग :
वडगाव जलकेंद्र परिसर
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
राजीव गांधी पम्पिंग
सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.