Pune | पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:45 IST2023-02-24T21:43:15+5:302023-02-24T21:45:02+5:30

ही माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे...

Water supply in deccan and kothrud area of Pune city stopped on Wednesday | Pune | पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

Pune | पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून एसएनडीटी परिसरात फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या बुधवारी (दि. १ मार्च) कर्वेनगर, कोथरूड, डेक्कनसह अन्य भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असलेला भाग : प्रभात रस्ता, कर्वे रस्ता, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयूर काॅलनी, डेक्कन परिसर, कोथरूड, संगम प्रेस रस्ता, करिष्मा सोसायटी, हॅपी काॅलनी, सहवास सोसायटी, कर्वेनगर परिसर, म्हात्रे पूल ते राजाराम पूल परिसर, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी, कर्वे पुतळा परिसर, आयडियल काॅलनी परिसर, पौड रस्ता, भांडारकर रस्ता, एसएनडीटी परिसर.

Web Title: Water supply in deccan and kothrud area of Pune city stopped on Wednesday