शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पुणे, साताऱ्यात पाणीटंचाई, दोन्हीकडे साडेसात हजारांहून अधिक नागरिक तहानलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:31 IST

धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात शिल्लक असला, तरी जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे

पुणे: गेल्या पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खोऱ्यांतील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्हे वगळता पुणे आणि सातारा जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत १६ तालुक्यांमधील साडेसात हजारांहून अधिक नागरिक तहानलेले आहेत. यासाठी प्रशासनाकडून तातडीने खासगी, सरकारी १३ विंधन विहिरी आरक्षित करून १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवते, अशा तालुक्यांतील वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

गेल्या वर्षी मोसमी पाऊस विलंबाने सुरू झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली होती. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाच्या धारा कोसळत होत्या. त्यामुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यांतील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तीव्र उन्हाळा आणि झळा बसण्यास सुरुवात झाली. सर्वाधिक टंचाई सातारा जिल्ह्यात बसत असून, या ठिकाणच्या माण, वाई, पाटण, खंडाळा, कराड या ठिकाणी जाणवत आहे; तर पुण्यातील आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दोन गावे आणि १९ वाड्यांवर ३ हजार २५१, वाई तालुक्यातील ४ गावे, ३ वाड्यांवरील ३ हजार ६५९ आणि पाटण तालुक्यातील २ वाड्यांवर ५९२ नागरिक पाणीटंचाईमुळे बाधित झाले आहेत. नागरिकांबरोबर पशुधनालाही पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, वाई आणि पाटण तालुक्यांतील अनुक्रमे १ हजार ४९५ आणि २९५ असे एकूण १ हजार ७९० पशुधन बाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून दिली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार महिने उन्हाच्या तीव्र झळा वाढणार आहे. धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात शिल्लक असला, तरी जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन केले असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या तालुका, गाव, वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहीर, विंधन विहीर ताब्यात घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त स्तरावर केले आहे.

विभागनिहाय आढावा

तालुका - बाधित लोकसंख्या - टँकर

आंबेगाव - ० - ९

माण - ३२५१ - २

वाई - ३६५९ - ३

पाटण - ५९२ - २

एकूण - ७५०२ - १६

English
हिंदी सारांश
Web Title : Pune, Satara Face Water Scarcity at Summer's Onset: Thousands Affected

Web Summary : Pune and Satara districts grapple with water scarcity despite adequate dam storage in western Maharashtra. Over 7,500 residents across 16 talukas are affected. Authorities are supplying water via tankers and reserving private wells to address the crisis.
टॅग्स :PuneपुणेWaterपाणीSatara areaसातारा परिसरRainपाऊसwater shortageपाणी कपातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcollectorजिल्हाधिकारी