ड्रेनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:10 IST2021-03-21T04:10:18+5:302021-03-21T04:10:18+5:30

तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर या डांबरी रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम साधारण महिन्यापासून सुरू आहे. धानोरे फाटा ते स्मशानभूमी दरम्यान ...

Water on the road due to burst drainage line | ड्रेनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी

ड्रेनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी

तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर या डांबरी रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम साधारण महिन्यापासून सुरू आहे. धानोरे फाटा ते स्मशानभूमी दरम्यान ग्रामपंचायतीची ड्रेनेज लाईन या रस्त्याच्या कडेने गेलेली असून दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या उकरल्यानंतर यामध्ये मुरूम व खडी भरण्यात आली आहे. ती भक्कम होण्यासाठी यावरून रोलर फिरवण्यात आल्याने रोलरच्या व्हायब्रेशन मुळे बाजार मैदानाजवळील स्मशानभूमी पासून काही अंतरापर्यंत या ड्रेनेज लाईनचे साधारण पाच ते दहा पाईप फुटले. ड्रेनेज लाईन फुटली गेल्याने सध्या ड्रेनेजचे पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. संबंधित विभागाने ही ड्रेनेज लाईन दुरुस्त करून द्यावी अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे.

ग्रामपंचायतीची ड्रेनेज लाईन सध्या चालू असणाऱ्या रस्त्यांच्या साईड पट्ट्यांच्या कामामुळेच फुटली गेलेली आहे.त्यामुळे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यास बोलावून घेऊन हे काम करून घेतले जाणार आहे.

संजय खेडकर, ग्रामविकास अधिकारी तळेगाव ढमढेरे

२० तळेगाव ढमढेरे

Web Title: Water on the road due to burst drainage line