शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

महापालिकेने अवघ्या १७ दिवसांत केले महिन्याचे पाणी गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 12:11 IST

गेल्या १७ दिवसांमध्ये खडकवासला धरण साखळीतील तब्बल १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी झाले आहे.

ठळक मुद्देधरणसाखळीतील स्थिती : जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान 

पुणे : दुष्काळी स्थितीत काटकसरीने पाणी वापरणे आवश्यक असतानाही, गेल्या १७ दिवसांमध्ये खडकवासला धरण साखळीतील तब्बल १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी झाले आहे. शहराला एक महिना पुरेल इतके हे पाणी आहे. यातील ०.९० टीएमसी पाण्याचा वापर महापालिकेने केला असेल, असे जलसंपदातील सूत्रांना सांगितले. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने १५ जुलैपर्यंत खडकवासला प्रकल्पातील पाणी पुरविण्याचे आव्हान आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ दश्लक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरण्याची संमती दिली होती. शहरात पाणी कपात करावी लागेल, या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. अखेरीस शहराला १३५० एमएलडी पाणी देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी शेतीच्या सिंचनाचे आवर्तन रद्द करण्यात आले. मात्र, इतके होऊनही शहराचा पाणी वापर मात्र कमी होताना दिसत नाही. खडकवासला प्रकल्पात २४ फेब्रुवारी रोजी ११.९४ टीएमसी पाणीसाठा होता. त्यात १२ मार्च अखेरीस १०.९३ टीएमसी पर्यंत घट झाली आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव टेमघर धरणातील पाणीसाठी ०.०१ टीएमसी पर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर, वरसगाव धरणात ४.९६, पानशेत ४.७० आणि खडकवासला धरणात १.२७ टीएमसी असा १०.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. शहरासह स्वतंत्र पाणी घेणाºया काही मोठ्या गृहनिर्माण संस्था, शहरालगतची गावे यांना देखील पाणी पुरवठा करावा लागतो. या स्थितीत पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात चारही धरणात मिळून १५.२७ टीएमसी पाणीसाठा होता.  ---------------------कालवा समितीची बैठक घेणार कार्यकारी संचालकआचारसंहिता लागू झाल्याने आगामी कालवा समितीची बैठक कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खालिद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली होईल, अशी माहिती जलसंपदामधील सूत्रांनी दिली. बैठकीची तारीख अद्याप ठरली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सध्याचा पाणी वापर आणि उन्हाळ््यात होणारे बाष्पीभवन या मुळे शेतीला उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपादा विभागाने या पुर्वीच जाहीर केले आहे. महापालिकेच्या वाढत्या पाणी वापराबाबत जलसंपदा नक्की काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.      

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीDamधरण