शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:28 IST

चीनने आपले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान लाँच करून जगाला धक्का दिला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले ही युद्धनौका अमेरिकेशी तुलनात्मक आहे, यामुळे भारत आणि फिलीपिन्समध्ये चिंता निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून पॅसिफिक महासागरात तणाव सुरू आहे, या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचे, "फुजियान" समु्द्रात उतरवली आहे. शनिवारी, चिनी पीएलए नौदलाने फुजियानच्या ऑपरेशनल डेमोचा व्हिडीओ जारी केला. या आठवड्यात, फुजियानचा कमिशनिंग समारंभ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत पार पडला.

चीनचे नवीन विमानवाहू जहाज इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट तंत्रज्ञानावर आधारित आहे. आतापर्यंत, हे तंत्रज्ञान फक्त यूएस जेराल्ड फोर्ड-क्लास विमानवाहू जहाजांवर वापरले जात होते. इलेक्ट्रॉनिक कॅटापल्ट तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमानांना कॅरियरच्या शॉर्ट-रनवे डेकवरून उड्डाण आणि लँडिंग करु शकते.

लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?

चीनचा फिलीपिन्ससोबतचा तणाव

दक्षिण चीन समुद्रात फिलीपिन्ससोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौका तयार केली आहे. गेल्या दोन वर्षांत, चीन आणि फिलीपिन्सच्या नौदलात अनेक हिंसक संघर्ष झाले आहेत. फिलीपिन्स अमेरिकेच्या चिथावणीवर चीनसोबत संघर्षाला चिथावणी देत ​​आहे, असा चीनचा आरोप आहे.

चीन दक्षिण चीन समुद्र आणि तैवानबाबतही अधिकाधिक आक्रमक होत आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला ते तैवानवर हल्ला करणार नाहीत, असे आश्वासन दिल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या हालचाली सातत्याने वाढत असल्याने चीनचा तिसरा विमानवाहू युद्धनौका देखील भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. हिंद महासागरात चिनी युद्धनौका, सर्वेक्षण जहाजे आणि पाणबुड्या वारंवार दिसतात.

काही दिवसापूर्वी भारतीय नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सयन यांनी सांगितले की, चिनी युद्धनौका हिंद महासागरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर पडेपर्यंत बारकाईने पाळत ठेवल्या जातात. भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत. भारतीय नौदलाने तिसऱ्या विमानवाहू जहाजाची तयारी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : China's Military Power Surges: Third Aircraft Carrier 'Fujian' Ready

Web Summary : China launched its third aircraft carrier, 'Fujian,' amid Pacific tensions. Equipped with advanced electromagnetic catapult technology, previously exclusive to US carriers, it enhances China's naval capabilities and raises concerns for India in the Indian Ocean region, where Chinese naval presence is growing.
टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारत