पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, विनामास्क फिरणाऱ्या तब्बल ४५१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 16:59 IST2021-04-18T16:57:44+5:302021-04-18T16:59:00+5:30

नागरिकंनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे - पोलिसांचे आवाहन

Violation of rules by citizens in weekend lockdown, action against 451 people walking around without masks | पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, विनामास्क फिरणाऱ्या तब्बल ४५१ जणांवर कारवाई

पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, विनामास्क फिरणाऱ्या तब्बल ४५१ जणांवर कारवाई

ठळक मुद्देशहरात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने गंभीर परिस्थिती

पिंपरी : कोरोनाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदीसह विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करताना शनिवारी पोलिसांनी विनामास्क फिरणा-या ४५१ जणांवर कारवाई केली आहे.

शहरात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरीत दररोज २, ३ हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात बेड न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण या दोन दिवसातही नागरिक घराबाहेर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामध्येही नागरिकांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसून ते सर्रास नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध कडक केले असून, त्याचे नागरिकांनी पालन करावे, घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (१०७), भोसरी (११), पिंपरी (०८), चिंचवड (५९), निगडी (१०६), आळंदी (१०), चाकण (०७), दिघी (०५), सांगवी (१६), वाकड (०७), हिंजवडी (११), तळेगाव दाभाडे (२९), चिखली (११), रावेत चौकी (५४), शिरगाव चौकी (१०) या पोलीस ठाण्यांतर्गत विनामास्क फिरणा-या ४५१ नागरिकांवर कारवाई झाली.

Web Title: Violation of rules by citizens in weekend lockdown, action against 451 people walking around without masks