नियमावलीचे उल्लंघन; कंपनीला १ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:11 IST2021-04-10T04:11:41+5:302021-04-10T04:11:41+5:30

वाकडेवाडी येथील कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी(दि. ९) अचानक पाहणी केली. त्या ...

Violation of regulations; The company was fined Rs 1 lakh | नियमावलीचे उल्लंघन; कंपनीला १ लाखाचा दंड

नियमावलीचे उल्लंघन; कंपनीला १ लाखाचा दंड

वाकडेवाडी येथील कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी(दि. ९) अचानक पाहणी केली. त्या वेळी तिथे एकूण ८७ कर्मचारी काम करत होते. तसेच कंपनीच्या कार्यालयात कुणीही सामाजिक अंतर पाळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कंपनीला ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच मास्क न वापरणाऱ्या १९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत एकूण १ लाख १८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यानंतर जर नियमांचे पालन झाले नाहीतर कंपनी सील करण्यात येईल अशी तंबीदेखील देण्यात आली.

शिवाजी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त आशा राऊत म्हणाल्या, महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार आस्थापना सुरू ठेवाव्यात, अन्यथा कोविड प्रतिबंधासाठी आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.

ही कारवाई शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय.एस.इनामदार, सुनील कांबळे,लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेश अडागळे, शाम माने, लक्ष्मण चौधरी, तुषार राऊत, नीलिमा काकडे, कविता सिसोलेकर, शिवाजी गायकवाड, शिवाजीराव नलवडे,किरण मांडेकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Violation of regulations; The company was fined Rs 1 lakh