शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील दीड लाख मतांची होणार पडताळणी : जिल्हाधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 08:00 IST

येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देचार मतदार संघातील 120 मतदान केंद्रांच्या मतांची मोजणीगुरुवारी (दि. २३) संध्याकाळी उशीरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता  जिल्ह्यातील चार मतदार संघांचे मतदान दोन वेगवेगळ्या टप्प्यात यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मोजणी केली जाणार

पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघातील एकूण 120 मतदान केंद्रांमधील तब्बल दीड लाख व्हीव्हीपॅट चिठ्ठयांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पोस्टने प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची आणि ईव्हीएममधील मतांची मतमोजणी पूर्ण झाली तरी अंतिम निकाल जाहीर होणार नाही. चिठ्ठ्यांच्या साहाय्याने लॉटरी काढून निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रांच्या स्लिपांची मोजणी झाल्यानंतरच खासदारकीची माळ कोणाच्या गळात पडणार याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निकाल कधी लागणार या बद्दलची कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. मात्र गुरुवारी (दि. २३) संध्याकाळी उशीरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यातही व्हीव्हीपॅट चिठ्यांची मतमोजणी, उमेदवारांचे आक्षेप यावरुन वाद उद्भवल्यास निकाल आणखी लांबू शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वास्तविक ईव्हीएमवर मतदान झाल्याने मतमोजणी कमीत कमी वेळेत होणे अपेक्षित असते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, जिल्ह्यातील चार मतदार संघांचे मतदान दोन वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात आले. पुणे व बारामती मतदार संघाचे मतदान २३ एप्रिलला तर आणि शिरूर व मावळ मतदार संघाचे मतदान २९ एप्रिलला झाले. देशातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदानाचा अंतिम टप्पा रविवारी (दि. १९) संपतो आहे. त्यानंतरच देशातली मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनानेही मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली असून मतदार संघनिहाय आणि प्रत्येक टेबल निहाय कर्मचा-यांच्या नियुक्तीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या चिठ्ठ्या तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघांतर्गत येणा-या विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांची चिठ्ठ्यांमधून लॉटरी काढली जाईल.त्यानंतर ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅटमध्ये जमा झालेल्या स्लिप्स यातील मतांची पडताळणी होईल.पुणे लोकसभा सभा मतदार संघातील कसबा, शिवाजीनगर, वडगावशेरी, कोथरूड ,पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व मतदार संघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांमधील मतांची मोजणी करण्यात येईल.त्यामुळे एका लोकसभा मतदार संघातील 30 मतदान केंद्रांची मोजणी होईल.तर चार लोकसभा मतदान केंद्रांमधील 120 मतदान केंद्रांची मोजणी करण्यात येईल............

यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मोजणी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे एका मतदान केंद्रावर बाराशे ते दीड हजार मतदान झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 120 मतदान केंद्रांमधील तब्बल दीड लाख व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करावी लागेल. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मते यात तफावत अढळून येण्याची शक्यता नाही. उमेदवारांनी यासंदर्भात काही आक्षेप घेतले तर त्यावर कोणता निर्णय घ्यावा,याबाबतही सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.  -नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९