राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव खरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:09 IST2021-04-19T04:09:44+5:302021-04-19T04:09:44+5:30

पुणे : वसंतराव खरे (वय ७५) यांचे शनिवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा ...

Vasantrao Khare, Senior Swayamsevak of Rashtriya Swayamsevak Sangh passed away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव खरे यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव खरे यांचे निधन

पुणे : वसंतराव खरे (वय ७५) यांचे शनिवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. पर्वती भागात कार्यरत असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते ज्येष्ठ स्वयंसेवक व बँक ऑफ महाराष्ट्रमधील निवृत्त कर्मचारी होते.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे, महाबँक कला क्रीडा मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट पतसंस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. ग्राहक पेठचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. ते उत्कृष्ट गीतगायक होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने स्व. मीनाताई ठाकरे नगर, मुकुंदनगर व महर्षींनगर भागातील झोपडपट्टीतील वंचित मुले व मुलींसाठी गेल्या २५ वर्षापासून सातत्त्याने श्री संत नारायण गुरू अभ्यासिका व संस्कारवर्ग चालविल्या. किशोरी विकास, मुलांसाठी संस्कार वर्ग, व्यायामशाळा, महिला बचतगट इ. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी समाजसेवा केली.

फोटो - वसंतराव खरे

Web Title: Vasantrao Khare, Senior Swayamsevak of Rashtriya Swayamsevak Sangh passed away