शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day 2026: आई जन्म देते अन् झाड ऑक्सिजन देऊन आपल्याला जगवते; २ माऊलींवर भरपूर प्रेम करा - सयाजी शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:43 IST

Valentine Day 2026 आई आपल्याला जन्म देत असते, त्यामुळे तिच्यावर तर प्रेम केलेच पाहिजे, पण जन्मानंतर आपला श्वास हा झाडांच्या ऑक्सिजनवर सुरू असतो. त्यामुळे आई आणि झाड या दोन माउलींवर भरपूर प्रेम करा

पुणे: कोणताही राजकीय नेता, नट किंवा शास्त्रज्ञ आपल्याला सावली देत नाही किंवा फळही देत नाही. त्यामुळे माझ्या मते, झाड हा खरा सेलिब्रिटी असून, त्याच्यावर प्रेम करायला हवं. झाडं आहेत, म्हणून आपण आहोत. आपल्याला आई जन्म देते, पण नंतर ऑक्सिजन देऊन झाडच आपल्याला जगवते.

झाड आपल्याला मरेपर्यंत ऑक्सिजन देते. त्यामुळे आई आणि झाड यापेक्षा मोठं काहीच नाही. त्यासाठी झाडं वाचवणे आवश्यक आहे. त्यांच्यावर प्रेम केले तरच आपण त्यांच्यावर कुऱ्हाड चालवणार नाही. झाडांच्या प्रेमापोटीच मी २०२० पासून वृक्षसंमेलन सुरू केले. पहिल्यांदा राज्यामध्ये बीड येथे देवराई साकारून तिथे वृक्षसंमेलन घेतले. या प्रेमापोटीच मी आता राज्यभरात शंभर देवराई साकारणार आहे. त्यासाठी अनेकजण मदतीला आले आहेत.

राज्यात आतापर्यंत ४० देवराई साकार झाल्या आहेत. देवराई म्हणजे आपली दुसरी आईच असते. कारण तिथेच आपल्याला प्रेम, माया, जिव्हाळा मिळतो. कडक उन्हामध्ये माउली रूपाची सावली झाडच देते. इतर कोणीही आपल्याला अशी सावली देत नाही. झाडं वाचली तरच आपण वाचू. कारण झाडांमुळेच आपण जीवंत आहोत. आई आपल्याला जन्म देत असते, त्यामुळे तिच्यावर तर प्रेम केलेच पाहिजे, पण जन्मानंतर आपला श्वास हा झाडांच्या ऑक्सिजनवर सुरू असतो. त्यामुळे आई आणि झाड या दोन माउलींवर भरपूर प्रेम करा. झाड आपल्याला फूल देते, फळ देते, पान देते, सावली देते. एवढं सगळं ते आपल्याला फुकटात देत असते. त्यामुळे तिची काळजी आपणच घेतली पाहिजे.

झाडांवरील प्रेम वाढावे म्हणून आम्ही रॅप गीतदेखील बनवले. त्यानंतर अरविंद जगताप यांनी एक सुंदर कविता केली आहे. तीदेखील आम्ही गात असतो.

मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ
झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ,
गोष्टी आहेत पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी
फुलांच्या खाणाखुणा, पेरू आम्ही रानीवनी...,
कधी होऊ पारंबी, कधी होऊ फांदी
हिरव्यागार जगाची, होऊ आम्ही नांदी ..
खास आम्ही होऊ श्वास आम्ही होऊ
मुळांचे कुळ घेऊ खोडांचे बळ होऊ
झाडाचे गुण घेऊ झाडाचे गुण गाऊ !
अशी ती कविता आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये ही गोष्ट पटकन जाते. आज हवामान बदल होत आहे. त्यामुळे झाडांवर प्रेम करून त्यांना वाचविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. झाडं वाचवूया, झाडं जगवूया, त्यांच्यावर प्रेम करूया!

English
हिंदी सारांश
Web Title : Love Mothers and Trees: Sayaji Shinde's Valentine's Day Message

Web Summary : Sayaji Shinde emphasizes loving trees alongside mothers, highlighting their life-giving oxygen. He advocates for tree conservation through initiatives like 'Devrai,' aiming to establish 100 such havens, urging everyone to cherish trees for a sustainable future.
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेsayaji shindeसयाजी शिंदेenvironmentपर्यावरणNatureनिसर्गHealthआरोग्यWomenमहिलाSocialसामाजिकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट