Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:30 IST2026-04-02T20:30:13+5:302026-04-02T20:30:34+5:30

Pune Rain खडकवासला धरणात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात किंचित वाढ झाली असून चारही धरणांत मिळून १३.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Unseasonal rains in Pune slightly increase water storage in Khadakwasla dam | Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ

Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ

पुणे : अवकाळी पावसाने गुरुवारी (दि. २) खडकवासला धरण क्षेत्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या असून, अडीच तासांत १०४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे धरणातीलपाणीसाठ्यात किंचित वाढ झाली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या काही तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, लगत असलेल्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. खडकवासला धरणात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. चारही धरणांत मिळून १३.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत एक टीएमसी जादा पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून नमूद करण्यात आले.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारपर्यंत (दि. ४) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, पशुधनाची सुरक्षित व्यवस्था करावी. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

Web Title : पुणे वर्षा: बेमौसम बारिश से खडकवासला बांध के जलस्तर में मामूली वृद्धि

Web Summary : पुणे में बेमौसम बारिश से खडकवासला बांध के जलस्तर में थोड़ी वृद्धि हुई। ढाई घंटे में 104 मिमी बारिश दर्ज की गई। बांध का कुल जलभराव 47.65% है, जो पिछले साल के स्तर से अधिक है। किसानों को आगे बारिश से फसलों को बचाने की सलाह दी गई है।

Web Title : Pune Rain: Khadakwasla Dam Receives Slight Boost from Unseasonal Showers

Web Summary : Pune experienced unseasonal rain, slightly increasing water levels in Khadakwasla Dam. 104mm rainfall recorded in two and a half hours. Overall dam storage is 47.65%, exceeding last year's levels. Farmers advised to protect crops from further predicted rainfall.