अज्ञात चोरट्यांचे वृद्धाच्या डोक्यात पहारीने वार; ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:04 IST2026-03-31T16:04:01+5:302026-03-31T16:04:26+5:30

पहाटेच्या सुमारास चोरी करायला आलेल्या चोरांनी ज्येष्ठाच्या डोक्यात पहारीने दोन वेळा वार करून खून केला

Unknown thieves stab elderly man in the head with a knife; Elderly man dies on the spot, incident in Ambegaon taluka | अज्ञात चोरट्यांचे वृद्धाच्या डोक्यात पहारीने वार; ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

अज्ञात चोरट्यांचे वृद्धाच्या डोक्यात पहारीने वार; ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

मंचर: चोरी करण्यासाठी आलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृद्धाच्या डोक्यात पहारीने वार करून त्यांचा खून केल्याची घटना थोरांदळे गावच्या हद्दीत पाईनमळा येथे पहाटे घडली आहे. दामोदर जयसिंग मिंडे (वय 62) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून मंचरपोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावच्या हद्दीतील पाईनमळा येथे दामोदर जयराम मिंडे हे एकटेच राहत होते. त्यांची पत्नी मरण पावली असून दोन मुले कामानिमित्त मुंबई व नारायणगाव येथे असल्याने ते घरात एकटेच होते. काल सायंकाळी साडेसहा वाजता मोबाईल वरून त्यांचे मुली बरोबर बोलणे झाले. रात्री जेवण करून मिंडे घराच्या समोरील पडवीत झोपले होते. या पडवीला बाहेरून निळी पट्टी बांधण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. त्यावेळी मिंडे जागे झाल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने दोन वेळा वार केले. खोलवर जखमा झाल्याने मिंडे खाली कोसळले. त्यावेळी चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरातील बॅगा बाहेर काढून उचकटवून पाहिल्या. मात्र त्यामध्ये कोणताही ऐवज मिळाला नाही. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. 

संबंधित दामोदर मिंडे हे गावातील श्री मारुती देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त असल्याने त्यांच्या सह्या घेण्यासाठी ट्रस्टचे सभासद त्यांना सकाळपासून फोन करत होते. मात्र मिंडे यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे सकाळी आठच्या सुमारास सदर सभासद सही घेण्यासाठी मिंडे यांच्या घरी आला. त्यावेळी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.पोलीस पाटील यांनी मंचर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने येऊन पंचनामा केला. मिंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमने येऊन ठसे घेतले आहे. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मिंडे यांच्या घरात कोणताही मौल्यवान ऐवज नसताना चोरट्यांनी त्यांचा खून केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात गीतल सतीश गावडे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव यांनी खुणाचा व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ करत आहे.

Web Title : अंबेगांव में बुजुर्ग की हत्या; चोरों ने कुल्हाड़ी से मारा

Web Summary : थोरांदले गांव में चोरों ने दामोदर मिंडे नामक एक बुजुर्ग व्यक्ति की कुल्हाड़ी से मारकर हत्या कर दी। मिंडे घर पर अकेले थे। शिकायत दर्ज होने के बाद पुलिस चोरी और हत्या की जांच कर रही है। समुदाय अपराधियों की गिरफ्तारी की मांग कर रहा है।

Web Title : Elderly Man Murdered in Ambegaon; Thieves Kill with Pickaxe

Web Summary : An elderly man, Damodar Minde, was murdered in Thorandale village by thieves who struck him with a pickaxe. Minde was alone at home. Police are investigating the theft and murder after a complaint was lodged. The community is demanding the arrest of the culprits.