शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पीसीएमटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: May 9, 2017 03:50 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतून पीएमपीमध्ये रुजू झालेल्या १७८ कर्मचाऱ्यांनी पिंपरी महापालिकेत रुजू करुन घेण्याची मागणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतून पीएमपीमध्ये रुजू झालेल्या १७८ कर्मचाऱ्यांनी पिंपरी महापालिकेत रुजू करुन घेण्याची मागणी केली असून, त्यांना महापालिकेत समाविष्ट करा किंवा पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांची नियुक्ती करा, याबाबत महापौर नितीन काळजे आग्रही आहेत. या संदर्भात मंगळवारी महापालिकेत बैठक होणार आहे.पीएमपीची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी पीएमपीमधील कार्यप्रणालीत बदल केले आहेत. पीसीएमटीकडील अतिरिक्त कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले. या कर्मचाऱ्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाला नितांत गरज असल्याने पीएमपीकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला दिले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना पीएमपीत तत्काळ रुजू होण्याच आदेश दिले होते. त्यानंतर देखील रुजू होण्यास कर्मचारी टाळाटाळ करत होते. परंतु, मुंढे यांनी रुजू न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी एप्रिलला पीएमपीमध्ये रुजू झाले होते. अनेक कर्मचारी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. त्यापैकी अनेक जण निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या कामगारांनी नेत्यांचे उंबरे झिजविणे सुरू केले आहे.