शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड; रुपाली चाकणकर यांची संतप्त प्रतिक्रिया…  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:07 IST

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल

पुणे - राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे घडली आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेडछाड केली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र कारवाई न झाल्याने स्वतः केंद्रीय मंत्री यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.सरकारला विरोधकांचा घेरावही घटना उघड होताच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवरच असे प्रकार घडत असतील, तर सामान्य मुलींचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेने कायद्याचा धाक कमी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.एकनाथ खडसेंचा संताप: “पोलीस असतानाही गुंडांचा धाक”!या घटनेवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या गुंडांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. यात्रेत उपस्थित असलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मग महिलांची सुरक्षा कशी राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रूपाली चाकणकर यांचा इशारा: “टवाळखोरांना जनतेसमोर आणू!”या घटनेवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या, “या प्रकरणाकडे मी स्वतः लक्ष देत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.”चाकणकर पुढे म्हणाल्या, “ही विकृती समाजातून नष्ट झाली पाहिजे. या गुन्हेगारांचे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत. केवळ काळे कपडे घालून निषेध करण्यापेक्षा, त्यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे.” यावेळी बोलताना त्यांनी, पोलीस तपासात मीडिया ट्रायल होऊ नये, पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन केले.महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरया घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, सरकार व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत छेडछाड झाल्याने सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकRupali Chakankarरुपाली चाकणकरraksha khadseरक्षा खडसेWomenमहिला