शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

दुर्दैवी! खेळताना गॅलरीमधून पडल्याने चिमुकलीचा बर्थ डे दिवशीच मृत्यू ; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 4:47 PM

वाढदिवसादिवशीच पडली पाचव्या मजल्यावरून खाली

धायरी: खेळताना घरातील गॅलरीमधून खाली पडल्याने चिमुकलीचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अद्विका धरतेज दाथाडे (वय: १ वर्ष, रा. राजवीर हाईट्स, अभिनव कॉलेज परिसर, नऱ्हे, पुणे) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. सदर घटना मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे बीड जिल्ह्यातील असणारे गाथाडे कुटुंबीय नऱ्हे परिसरात वास्तव्यास आहेत. धरतेज दाथाडे हे खासगी कंपनीत कामास असून ते अभिनव कॉलेज परिसरातील राजवीर हाईट्समध्ये पाचव्या मजल्यावर राहावयास आहेत. बुधवारी धरतेज यांची कन्या अद्विकाचा पहिला वाढदिवस असल्याने सायंकाळी घरी धावपळ सुरू होती. वाढदिवसाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. इमारतीतील लोकांना वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी अद्वीकाची आई दुसऱ्या मजल्यावर गेली. दरम्यान तिचे वडील बाथरूममध्ये गेले असता अद्विका खेळता - खेळता गॅलरीकडे गेली, व तिचा तोल जाऊन खाली पडली.  शेजाऱ्यांना दाथाडे यांच्या गॅलरीतून अद्वीका खाली पडल्याचे दिसले. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास तिचा उपचारादम्यान मृत्यू झाला. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत. 

टॅग्स :DhayariधायरीDeathमृत्यूPoliceपोलिस